Posts

Showing posts with the label औरंगजेब

छ. शिवराय: दुर्दम्य इच्छाशक्ती

Image
        स्वतःच्या कर्तृत्वाने अजरामर झालेल्या छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्वाचे किती वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या गुणांचे वर्णन करण्यासाठी शब्ददेखील अपुरे पडतात! त्यांच्या जीवनाबाबत विचार करताना वेगवेगळे मुद्दे समोर येतात. त्यांच्या यशस्वी युगप्रवर्तक जीवनाची गुरुकिल्ली कोणती? असे म्हटले तर अनेक उत्तरे बरोबर असू शकतात. परंतु त्यांची जी दुर्दम्य इच्छाशक्ती होती ती कधीही क्षीण झाली नाही! त्यामुळे प्रसंग कोणताही असो त्या प्रसंगात अभिनव विचार करून त्यांनी मार्ग काढला असे लक्षात येते.    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         अगदी बालवयातच हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेऊन वचनबद्ध झालेल्या शिवरायांनी आपल्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे धोरण अमलात आणले. तत्कालीन महाराष्ट्रावर विजापूरच्या आदिलशहाचा जवळपास एकछत्री अंमल होता. त्यामुळे त्याच्या नजरेतून ही गोष्ट सुटणे शक्य नव्हते. त्याच्या सत्तेला दिले गेलेले हे आव्हान तो दुर्लक्षित करेल हे देखील शक्य नव्हते. त्यामुळे शिवरायांवरती दबाव आणावा या हेतूने शहाजीराजांना कपटाने कैद करण्यात ...

जादूटोणा ?!

Image
     जगामध्ये चमत्कार, जादूटोणा यांची खूप चर्चा होत असते. आहेत की नाहीत अशा दोन्ही बाजूंनी भरपूर सांगितले जाते. परंतु जगभर याप्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. जनमानसावर त्याचा विलक्षण पगडा असतो. विशेषतः ऐतिहासिक काळात तर याबाबत बरेच गूढ वातावरण होते. इतके की  एका माहितीनुसार युरोपमध्ये चौदावे ते अठरावे शतक या मध्ययुगीन काळात हजारो जणांवर खटले चालवले गेले . त्यातील अनेकांना दोषी ठरवून जिवंत जाळणे, शिरच्छेद किंवा फाशी अशा शिक्षा देण्यात आल्या. भारतातही गौड बंगाल, काळी जादू, जादूटोणा, भानामती या नावांनी अशा गोष्टी प्रचलित आहेत.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       सध्याचे हिंदी भाषेतील आघाडीचे लेखक, चित्रपट कथाकार श्री.अक्षत गुप्ता यांच्या काही मुलाखती नुकत्याच ऐकल्या. त्यामध्ये त्यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगितला. २०१४ पासून त्यांच्या आयुष्यात अनेक उलथापालथी झाल्या. घटस्फोट झाला,‌ चांगला चालत असलेला हॉटेल व्यवसाय नुकसानीत गेला, अपघात झाला,‌आत्महत्येचाही अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या धाकट्या भावाने यावर त...

छ.शिवराय : गुणीजनांचे आश्रयस्थान

Image
       छ.शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यात अतिशय प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या कर्तृत्वाची माहिती जसजशी पसरत गेली तसतसे अनेक ठिकाणांहून गुणीजन आणि निष्ठावंत शिवरायांकडे आकर्षित झाले‌. यामध्ये सर्व स्तरातील लोक होते. बुद्धिमंत, कलावंत, सामान्य जन सर्वचजण स्वराज्याकडे खेचले गेले. महाराजांपाशी आपल्या कलागुणांचे चीज होईल, निष्ठेची कदर होईल अशी सर्वांना खात्री होती. त्यापैकी काही उदाहरणे पाहूया.        अफजलखानाच्या वधानंतर सुमारे १८ दिवसांत नोव्हेंबर १६५९ मध्ये महाराजांनी प्रतापगडापासून ते पन्हाळ्यापर्यंत स्वतः विस्तार केला. या परिसरातील जनतेला शिवरायांच्या आचार विचार आणि धोरणामधील वेगळेपण, सच्चेपण भावले. यातच एक होते पन्हाळ्याजवळील नेबापूरचे शिवा काशीद. लोकांचे केशकर्तन उपजीविका करणाऱ्या काशीदांचे अनोखेपण म्हणजे ते शिवरायांसारखे दिसत. शिवरायांचा आणि काशीदांचा सहवास जेमतेम ६-७ महिन्यांचा. परंतु मोक्याच्या वेळी प्राण जाण्याची खात्री असतानाही शिवरायांची वेशभूषा करून ते सिद्दी जौहरला चकवा देण्याच्या प्रयत्नात सहभागी झाले आणि शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी आत्...

छ.शिवराय : हिंदुंवरील आक्रमणाचा प्रतिकार

Image
  मध्ययुगीन काळातील मुस्लिम व ख्रिश्चन शासकांचा हेतू केवळ राज्य जिंकणे व संपत्तीची लूट करणे एवढेच होते असे मानणे भाबडेपणा ठरेल. धर्मप्रसार हा या राज्यकर्त्यांचा एक हेतू होताच. यासाठी अनेक क्रूर प्रकार केले जात. याची काही मोजकी उदाहरणे पाहूया.  फ्रेंच प्रवासी ताव्हेर्निये लिहितो,  " कालाबाग हे एक मोठे गाव आहे आणि येथे पुर्वी मुघल बादशहाला खंडणी देणारा एक मोठा राजा रहात असे. येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांकडून आणि व्यापाऱ्यांकडून तो मोठ्या प्रमाणावर लूट गोळा करीत असे, परंतु औरंगजेब राज्यावर आल्यानंतर त्याने या राजाचा आणि त्याच्या बऱ्याचशा प्रजेचाही शिरच्छेद केला. गावातील मुख्य रस्त्यांच्या नजीक असंख्य खिडक्यांचे मनोरे बांधून प्रत्येक खिडकीवर ठार मारलेल्या माणसाचे डोके ठेवले आहे. प्रत्येक दोन फुटांवर एक-एक डोके याप्रमाणे ही डोकी सर्व मनोऱ्यावर लावून ठेवण्यात आली आहेत. माझ्या मागच्या प्रवासाच्या वेळेस म्हणजेच सन १६६५ रोजी मी कालाबागवरून गेलो तेव्हा हे हत्याकांड होऊन फार दिवस झाले नसावेत , कारण त्यावेळेस ही डोकी शाबूत होती आणि त्यातून अत्यंत घाणेरडा दर्प येत होता."    ...

छ.शिवराय : शेती व महसूलविषयक धोरण

Image
       " महसूल न्यून होणे ही राज्याची सीर्णता. तो राज्यलक्ष्मीचा पराभव" असे वाक्य ऐतिहासिक साधनात वाचायला मिळते. त्यामुळे मध्ययुगात शेतीपासून जास्तीत जास्त महसूल मिळवणे हेच राज्यकर्त्यांचे धोरण असे.  ( लाल महालातील शिल्प इंटरनेटवरून साभार )          शिवाजी महाराजांचे धोरण पाहण्यापूर्वी तत्कालीन अन्य राज्यकर्ते मोगल, आदिलशाह निजामशाह, कुतुबशाह यांचे धोरण पाहिले पाहिजे. या सर्वांच्या राज्यांमध्ये शेतीवर ६० % कर आकारणी होत असे. त्यामुळे लागवडीचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत खाली घसरले होते. तसेच जे शेतकरी सारा देऊ शकत नसत अशांवर पाशवी अत्याचार होत असत. त्यांची मुंडकी तोडून त्यांचे मिनार रचले जात असत. शिर नसलेली धडे झाडांना टांगली जात. पीटर मुंडी या इंग्लिश प्रवाशाने पाटणा ते आग्रा या प्रवासात जे मुंडक्यांचे मिनार पाहिले त्यातील मुंडक्यांची मोजदाद करून आठ हजार मुंडकी पाहिल्याचे लिहून ठेवले आहे. मुघलांचा मनसबदार अब्दुल्ला फिरोजजंग बहादूर याने १६३२ मध्ये स्वतःच लिहून ठेवले आहे की मी दोन लाख शेतकऱ्यांना ठार मारले आहे. औरंगजेबाने गुजरातचा सुभेदार १६...

छ.शिवराय : स्वामिनिष्ठांचा प्रामाणिकपणा

Image
  छ. शिवाजी महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांनी उभी केलेली स्वामिनिष्ठांची मांदियाळी.‌ स्वराज्याच्या कामासाठी सर्व प्रकारचा त्याग करायला तयार असणारे हजारो लोक त्यांनी उभे केले. यामध्ये " आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे" असे म्हणणारे तानाजी मालुसरे आहेत. " तोफेआधी मरे न बाजी सांगा मृत्यूला" असं म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे आहेत. ' मातेस्तव धडही लढते संग्रामात ' असं ज्यांच्या आवेशाचं वर्णन केलं जातं ते मुरार बाजी देशपांडे आहेत. महाराजांच्या आज्ञेसरशी आखाड्यात उतरून पिसाळलेल्या हत्तीशी झुंज घेऊन त्याला लोळवणारे येसाजी कंक आहेत. अशी कितीतरी नावे सांगता येतील. अशी कणखर मनाची माणसे शिवरायांनी उभी केली. त्यांच्याबद्दल म्हणता येईल की, ' कालगतीहून बलवत्तर ही पौरूषशाली मने, याच मनांच्या अमित बलावर लाख झुंजवू रणे".           ‌( छायाचित्र सौजन्य अपूर्व सुरवसे )     या सगळ्यांचे वैशिष्ट्य असे की त्यांचा पराक्रम, कर्तृत्व ते शिवरायांना सांगायचेच पण प्रसंगी आपल्या चुकादेखील सांगायचे. हा प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वा...