Posts

Realisation of my poverty

Image
 "How poor am l!" - this question arose in my mind. This feeling had never come to my mind before. But today the feeling of poverty had become dense in my heart. Before this, in such a situation, I used to feel encouraged. I used to feel enthusiastic, but today this feeling came to my mind for the first time. I was a little startled. But then I realized that it is true.  "Indeed I am poor!" _(Picture generated with the help of Artificial Intelligence)_ This is from about two years ago. I had gone to Nashik. At that time I went to a book exhibition there. In the exhibition, thousands of books in English and Marathi were displayed. Of those, I had read only a few books, while I had seen some books or at least had some information about them. So a thought suddenly came to my mind that, "Books are wealth. But even though the books I have read so far are many, they are very few compared to the thousands of books here. And if we consider the total number of books in ...

मला जाणवलेली माझी गरीबी

Image
  "आपण किती गरीब आहोत?" माझ्या मनात प्रश्न उमटला. यापूर्वी ही भावना मनात कधी आली नव्हती. आज मात्र गरीबीचा भाव मनात दाटून आला होता. यापूर्वी अशा परिस्थितीत हुरुप वाटायचा. उत्साह यायचा पण आज ही भावना मनामध्ये पहिल्यांदाच आली होती. थोडासा चमकलो. पण नंतर लक्षात आलं की बरोबरच आहे. "आहोतच आपण गरीब!"            (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र) सुमारे दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. नाशिकला गेलो होतो. तेव्हा तिथल्या एका ग्रंथप्रदर्शनात गेलो. प्रदर्शनात इंग्रजी आणि मराठी भाषेतील हजारो पुस्तके मांडून ठेवलेली होती. त्यापैकी काहीच पुस्तके यापूर्वी वाचलेली होती तर काही पुस्तके बघितलेली होती किंवा त्याबद्दल काही माहिती तरी होते. त्यामुळे एकदम मनात विचार आला की, "ग्रंथ ही संपत्ती आहे. पण आपणतर आजपर्यंत वाचलेली पुस्तके अनेक असली तरी इथल्या हजारो पुस्तकांच्या तुलनेत ती कमीच आहेत. आणि जगातील एकूण पुस्तकांचा विचार केला तर ती फारच अल्प आहेत. ग्रंथश्रीमंतीच्या बाबतीत आपण गरीब आहोत." हाच तो माझ्या गरीबीबाबतचा माझा विचार.       ...

Don't learn this from teachers!

Image
 Teachers' behaviour is an important factor in the process of education. Teachers are human too, so their conduct can't always be expected to be perfect. That's why students are expected to follow only their teachers' good conduct. This very expectation is expressed in the Upanishads, part of India's ancient knowledge tradition. There is a text called the Taittiriya Upanishad, and it has a chapter called Shikshavalli, which contains the following passage. While instructing his students, the teacher says: 'Yani asmakam sucharitani | tani sevitavyani | na itarani ||' It means: follow only our good qualities, not the rest, that is, our flaws. Jnana Prabodhini in Pune is a distinctive institution in the field of education. The late Yashwantrao Lele had been a teacher there since its earliest days, and I heard him speak in 2012–13. He made a point that day: "As teachers, we consciously try to teach students many things. But are we paying attention to what th...

शिक्षकांकडून हे शिकू नका!

Image
   शिक्षणाच्या प्रक्रियेत शिक्षकांचे वागणे हा एक महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकदेखील माणूसच असतात. त्यामुळे त्यांचे वागणे परिपूर्ण असेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे चांगले आचरण तेवढेच अनुसरावे अशी अपेक्षा असते. हीच अपेक्षा भारतातील प्राचीन ज्ञान परंपरेच्या उपनिषद ग्रंथात व्यक्त केली आहे. तैत्तिरीय उपनिषद आहे. त्यात एक शिक्षावल्ली नावाचा अध्याय आहे. त्याच्यात पुढील उतारा आहे. आचार्य विद्यार्थ्यांना उपदेश करताना सांगतात 'यानि अस्माकम् सुचरितानि| तानि सेवितव्यानि| न इतराणि||'      याचा अर्थ असा की आमच्या फक्त चांगल्या गुणांचे अनुकरण करा . इतर गुणांचे म्हणजेच दोषांचे नव्हे.           पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी ही शिक्षणक्षेत्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण संस्था आहे. त्या संस्थेचे अगदी सुरुवातीच्या काळापासून ज्यांनी शिक्षक म्हणून काम केले अशा कै. यशवंतराव लेले यांचे बोलण २०१२-१३ मध्ये ऐकले होते. त्यावेळी त्यांनी एक मुद्दा मांडला होता. ' शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अनेक गोष्टी शिक...

उदार मनाचे शिक्षक

Image
     माणसे जगण्यासाठी विविध व्यवसाय अथवा नोकऱ्या करतात. यातून अर्थ प्राप्ती होते. ही महत्त्वाची असते. यातील काही पेशांना समाजात आदराचे स्थान दिले जाते. त्यातील एक म्हणजे शिक्षकी पेशा. शिक्षकी देशामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचे परस्पर संबंध हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या यामध्ये शिक्षक हे नेहमी वयाने विद्यार्थ्यांपेक्षा मोठे असतात त्यामुळे त्यांच्यावरची जबाबदारी ही जास्त असते. ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडलेल्या दोन शिक्षकांच्या आयुष्यातील हे प्रसंग.                         (श्री ललितदादा पाठक)          १९६८-७० मधील गोष्ट आहे. नंदुरबारवरून धुळ्याला अद्यापक विद्यालयात शिकण्यासाठी आलेला ललित पाठक हा विद्यार्थी एके रात्री आपली दैनंदिनी लिहायला बसला होता. तो आज अतिशय संतापात होता. त्या संतापाच्या घरात आपल्या दैनंदिनित त्याने वाक्य लिहिले, " जर माझ्याकडे चाकू असता तर मी प्राचार्य  पाटील यांना भोकसले असते." असे लिहिण्याचं कारण काय होतं? तर त्यादिवशी रस्त्यावरून जाणाऱ्या  ...

Big Hearted Teachers

Image
    People take up various professions or jobs to earn a living. This income is essential. Some of these professions are held in high regard by society, and teaching is one of them. In the teaching profession, the relationship between students and teachers is an extremely important factor. Since teachers are always older than their students, they carry a greater responsibility. Here are two incidents of teachers who fulfilled that responsibility beautifully.                     (Shri. Lalitdada Pathak) This happened sometime between 1968 and 1970. Lalit Pathak, a student who had come from Nandurbar to Dhule to study at the Teachers' Training College, sat down one night to write in his diary. He was furious that day. In his anger, he wrote in his diary, "If I had a knife, I would have stabbed Principal Patil." What had caused him to write such a thing? That day, some students at the training college had mocked an elderly man in...

सामाजिक जाणिवेतून कृती करणाऱ्या व्यक्तिंची आनंददायक भेट

Image
            गेल्या काही दशकांपासून आमच्या म.ए.सो. महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहात दरवर्षी 'सामाजिक रक्षाबंधन' हा उपक्रम घेण्यात येतो. यामध्ये समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तिंना आमंत्रित करण्यात येते. त्यांचे कार्य, अनुभव यांचा परिचय वसतिगृहात राहणाऱ्या मुलामुलींना करून देण्यात येतो. यावर्षी या उपक्रमामध्ये निवृत्त हवामान शास्त्रज्ञ डॉ.मिलिंद मुजुमदार यांना बोलावण्यात आले होते. (मध्यभागी टोपी घातलेले डॉ. मिलिंद मुजुमदार, त्यांच्या उजवीकडे श्री प्रशांत कुलकर्णी)             वसतिगृहातील मुलामुलींनी मिलिंदराव यांची मुलाखत घेतली. त्यातून त्यांच्या कार्याची ओळख उपस्थितांना झाली. मूळचे खंडवा, मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेल्या मिलिंदराव यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीर्घकाळ पुण्यातील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरियॉलॉजी' (IITM) या संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून काम केले आणि सुमारे दोन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाली. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला व्हावा यासाठी मिलिंदराव सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यासाठी विविध ठिकाणी तापमान...