आचार्य अत्रे यांचे काही चित्रपट
नाट्य क्षेत्रात मिळालेल्या यशामुळे आचार्य अत्रे यांना आणखीनच प्रसिद्धी मिळाली. त्यातून त्यांचे चित्रपट लेखन सुरू झाले. सुरुवातीला दादासाहेब तोरणे, विश्राम बेडेकर यांच्यासाठी त्यांनी प्रत्येकी एक पटकथा लिहिली. परंतु दिग्दर्शकांनी त्या पटकथेत पुष्कळ दुरुस्त्या केल्या. ते आचार्य अत्रे यांना पटले नाही म्हणून त्यांनी चित्रपटासाठी कथा लेखन करायचे नाही असे ठरवले. पण नंतर 'हंस पिक्चर्स' संस्थेच्या निमित्ताने त्यांची बाबुराव पेंढारकर , मास्टर विनायक यांच्याशी ओळख झाली आणि चित्रपट लेखनाला सुरुवात झाली. त्यातून त्यांनी धर्मवीर, ब्रम्हचारी, ब्रॅंडीची बाटली, अर्धांगी अशा काही चित्रपटांच्या कथांचे लेखन केले. हे चित्रपट पुष्कळ प्रसिद्धीस आले. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) यानंतर नवयुग चित्रपट कंपनी स्थापन करण्यात आली. त्यामध्ये हे सर्वजण संचालक म्हणून सहभागी झाले. परंतु या कंपनीच्या कामकाजात मतभेद झाल्यानंतर अत्रे बाहेर पडले. पण चित्रपट निर्मिती करण्याची इच्छा अत्रे यांना स्वस्थ बसू देत नव्हती...