सामाजिक जाणिवेतून...
२०१३ हे स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीचे वर्ष. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या वतीने दरवर्षी भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा घेतली जाते आणि त्यातून स्वामीजींचे कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.२०१२ पासूनच आमच्या म.ए.सो.गरवारे महाविद्यालयातील तसेच म.ए.सो. वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी यात सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केले. या परीक्षेत वसतिगृहातील अनेक मुला-मुलींनी भाग घेतला. त्याच बरोबर स्वामीजींचे जीवन व कार्य वसतिगृहाच्या सर्व मुला-मुलींना समजावे यासाठी स्वामीजींच्या जन्मदिनी २०१२ मध्ये दामोदर रामदासी यांचा स्वामीजींच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग, २०१३ मध्ये कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे कीर्तन ,तर २०१४ मध्ये शाहीर बापू पवार यांचे पोवाडा गायन या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. हे सगळे कार्यक्रम करत असताना मुला मुलींच्या विचारांना चालना मिळत होती. २०१५ मध्ये देखील या परीक्षेला मुलेमुली बसली होती. त्यानंतर एके दिवशी रात्री मी या मुला-मुलींशी बोललो. स्वामीजींचा कोणता विचार सगळ्यात महत्त्वाचा वाटतो यावर मनमोकळी च...