Posts

Showing posts with the label भगवान शंकर

वैयक्तिक दुःखाचे हलाहल पचवून समाजासाठी कार्यरत राहणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

Image
     नुकताच श्रावण मास सुरू झाला आहे. हिंदू समाजात हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. अनेक व्रत वैकल्ये या महिन्यात केली जातात. भगवान शंकर यांची विशेष आराधना या महिन्यातील सोमवारी केली जाते. या भगवान शंकरांची ज्यांनी निस्सीम आराधना केली अशा १८ व्या शतकातील कर्तृत्ववान महान महिला म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर! त्यांचे चरित्र ऐकत असताना मला भगवान शंकरांच्या नीळकंठ या विशेषणाची आठवण झाली. भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे हलाहल प्राशन करून जगाचे कल्याण केले त्याचप्रमाणे वैयक्तिक आयुष्यात अहिल्याबाईंना देखील दुःखाचे हलाहल प्राशन करावे लागले.    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         महाराष्ट्रातील चौंडी या गावी जन्मलेल्या अहिल्याबाई यांचे तेज थोरले बाजीराव पेशवे यांचे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांच्या नजरेत भरले. आपला मुलगा खंडेराव याच्याशी त्यांनी अहिल्याबाई यांचा विवाह लावून दिला. आपल्या अंगभूत गुणांमुळे महत्त्वाचे अहिल्याबाई विवाहानंतर आपले सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या आणि पुढची अनेक दशके होळकरांच्या जहागि...