आचार्य अत्रे यांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी कविता, नाटक, वक्तृत्व, चित्रपट, वृत्तपत्र, संसदीय लोकशाही अशा अनेक क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केली. त्याचबरोबर त्यांनी शिक्षण क्षेत्रातही महत्त्वाची कामगिरी केली आहे. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) अत्रे यांना वकील व्हायचे होते पण वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ते शिक्षण क्षेत्रात आले. १९१९ मध्ये बी.ए. झाल्यावर त्यांचे वडील अचानक मरण पावले. तेव्हा मुंबईत जाऊन नोकरी करत करत वकील व्हायचे असे ठरवून ते मुंबईला आले. मुंबईत त्यांनी सॅंडहर्स्ट हायस्कूल, रॉबर्ट मनी हायस्कूल , न्यू हायस्कूल ( भर्डा हायस्कूल ) अशा तीन शाळांमध्ये जवळपास दोन अडीच वर्षे काम केले. त्यातील न्यू हायस्कूलमध्ये शिक्षण क्षेत्रातील नवनवीन कल्पनांचा त्यांना अनुभव मिळाला. ते उत्साहाने वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होत असत. मुंबईची हवा मानवली नाही. प्रकृती खूप खराब झाली म्हणून ते मुंबई सोडून परत पुण्याला आले. काही महिने अहिल्यानगर येथे विश्रांती व उपचार घेऊन परत पुण्याला...