गडहिंग्लज : काही संस्मरणीय क्षण
दि.३ जानेवारी २०१६ रोजी होणाऱ्या " शिवशक्तीसंगम" या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्मासाठी १४-१७ नोव्हेंबर गडहिंग्लजमध्ये ( कोल्हापूर) विस्तारक होतो. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांची भेट झाली. संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची भूमिका दिसली. या विस्तारक काळातील अनुभव संघकामाची प्रेरणा आणखी बळकट करणारा होता. काही संस्मरणीय क्षण - * एका घरी सकाळीसकाळी गेलो तेव्हा काकूंनी येऊन पटकन औक्षण केले. * शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याच्या घरी कै.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाला जाणे झाले. * देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी आयुष्यभर काम करणारे श्री. विठ्ठलराव बन्ने यांच्या घरी त्यांच्या मुलाशी भेट व चर्चा झाली. * नाईक समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते श्री.शिवाजी नाईक यांची भेट झाली.संघकाम हे सर्व भेदांच्या पलिकडे जाणारे आहे व ते अजून वाढले पाहिजे असे ते तळमळीने सांगत होते. * शिक्षणतज्ञ जे.पी.नाईक यांचे नातेवाईक प्रा.श्रीकांत नाईक यांची भेट झाली.ते दरवर्षी उत्तुर गावात १-७ जानेवारी या काळात व्याख्यानमाला च...