Posts

Showing posts with the label डॉ बाबासाहेब आंबेडकर

मला जाणवलेली माझी गरीबी

Image
  "आपण किती गरीब आहोत?" माझ्या मनात प्रश्न उमटला. यापूर्वी ही भावना मनात कधी आली नव्हती. आज मात्र गरीबीचा भाव मनात दाटून आला होता. यापूर्वी अशा परिस्थितीत हुरुप वाटायचा. उत्साह यायचा पण आज ही भावना मनामध्ये पहिल्यांदाच आली होती. थोडासा चमकलो. पण नंतर लक्षात आलं की बरोबरच आहे. "आहोतच आपण गरीब!"            (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र) सुमारे दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. नाशिकला गेलो होतो. तेव्हा तिथल्या एका ग्रंथप्रदर्शनात गेलो. प्रदर्शनात इंग्रजी आणि मराठी भाषेतील हजारो पुस्तके मांडून ठेवलेली होती. त्यापैकी काहीच पुस्तके यापूर्वी वाचलेली होती तर काही पुस्तके बघितलेली होती किंवा त्याबद्दल काही माहिती तरी होते. त्यामुळे एकदम मनात विचार आला की, "ग्रंथ ही संपत्ती आहे. पण आपणतर आजपर्यंत वाचलेली पुस्तके अनेक असली तरी इथल्या हजारो पुस्तकांच्या तुलनेत ती कमीच आहेत. आणि जगातील एकूण पुस्तकांचा विचार केला तर ती फारच अल्प आहेत. ग्रंथश्रीमंतीच्या बाबतीत आपण गरीब आहोत." हाच तो माझ्या गरीबीबाबतचा माझा विचार.       ...

महामानवाची करूणा

Image
         'सर्वांभूती ईश्वराचा अंश आहे' असं सांगणाऱ्या संस्कृतीनेच माणसाला माणुसकीचे अधिकार नाकारले हा केवढा मोठा विरोधाभास! हा विरोधाभास दुःखद, अन्यायकारक आणि संतापजनकही आहे. परंतु चालत आलेल्या रुढीला मोडता कसा घालायचा म्हणून हा अन्याय सहन करणाऱ्यांनी देखील तो जवळपास निमुटपणे सहन केला. केवळ आर्जवं केली. संत चोखामेळा यांच्या अभंगात 'उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही याती हीन' अशा प्रकारची हतबलता केवळ व्यक्त केली. परंतु या अन्यायकारक परिस्थिती विरुद्ध दंड थोपटून उभे राहिले ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समाज म्हणून तर अपमानित जिणं पिढ्यानुपिढ्या वाट्याला आलं होतंच. परंतु बाबासाहेब दहा वर्षांचे असताना साताऱ्याहून कोरेगावला वडिलांना भेटायला जाताना जो शून्य माणुसकीचा अनुभव त्यांना आला त्याने त्यांचा अंगभूत स्वाभिमान खडबडून चेतवला. रूढींच्या जुलमी साखळदंडांनी पाय जखडलेले असतानादेखील                                                      ...

संत गाडगेबाबांची शिकवण

Image
       हल्ली जिकडे तिकडे माणसे मोबाईल मध्ये तासनतास गुंतून पडलेली दिसतात. त्यामुळे वेगळा विचार मनात येणे, त्याच्यावर काही चिंतन करणे आणि त्यातून काही निष्पन्न होऊन आयुष्याला दिशा मिळणे अशा गोष्टी कमी होत चाललेल्या दिसतात. अशी माणसे बघितली की बऱ्याच वेळा मला गाडगेबाबांची हमखास आठवण येते. गाडगेबाबांच्या एकांतातील चिंतनातून त्यांचे स्वयंभू व्यक्तिमत्त्व घडले असे मला वाटते. यामुळेच अशी मोबाईलमध्ये सतत गुंतलेली माणसे दिसली की गाडगेबाबांची आठवण येते.         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )          माणूस शिक्षणाने प्रगल्भ होत जातो असे म्हणतात. परंतु सर्वच माणसे शिक्षणामुळे प्रगल्भ झाली आहेत काय असा प्रश्न मनात येण्यासारख्या घटना आजूबाजूला घडताना दिसतात. जे रूढार्थाने शिकले नाहीत त्यांच्यातदेखील शहाणपण असते. प्रगल्भता असते. नव्हे नव्हे काहीजण तर शिकलेल्यांपेक्षाही अधिक प्रगल्भ दिसतात. अशाच मालिकेतील एक नाव म्हणजे संत गाडगेबाबांचे! रूढार्थाने त्यांचे शिक्षण झाले नाही. परंतु लहानपणी गावाबाहेर जाऊन जनावरांना चरायला घेऊन जाणे हे त्या...

अजुनि रुसूनि आहे मतदार!

Image
     कवी अनिल यांनी लिहिलेले आणि कुमार गंधर्व यांनी संगीत देऊन स्वतः गायलेले एक गीत आहे , ' अजुनि रूसूनि आहे,‌‌‌‌‌‌‌‌‌खुलता कळी खुलेना.' या गीताचा संदर्भ, विषय आणि आशय एका प्रियकराचा, पतीचा आपल्या प्रेयसीच्या, पत्नीच्या रूसव्याबाबतचा आहे. कवी अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे यांच्या पत्नी कुसुमावती यांच्या निधनानंतर ही कविता त्यांनी लिहिली आणि नंतर त्याचे गीत झाले. यूट्यूबवर ते ऐकता येईल. या लेखातील विषयाचा विचार करताना त्या गीताचे पहिले काही शब्द मला या विषयासाठी योग्य वाटले म्हणून ते शीर्षकात वापरले आहेत. पण गीताचा विषय आणि लेखाचा विषय अतिशय वेगवेगळे आहेत.      सध्या भारतात लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. हा लेख प्रसिद्ध होत असताना निवडणुकीच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व मतदार संघातील मतदान संपले आहे. देशपातळीवर लक्षात घेतले तर साधारण ३८ % ते ८० % असे मतदान झाले आहे. महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी साधारण ५० % ते ६८% पर्यंत आहे.                          ( पुण्यात लावलेला...