Posts

Showing posts with the label विवेकानंद केंद्र

संचित पुढच्या पिढ्यांकडे सोपवण्याचं आव्हान

  "अरे तुझं एक्सपरिमेंट शीट अगदी चांगदेवाच्या पत्रासारखं कोरं आहे!"... मी " सर, चांगदेव कोण?"... विद्यार्थी गेल्या काही दशकांमध्ये भारतात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ही वाढ केवळ महाराष्ट्रातच आहे असे नाही ही तर देशातील बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये आहे. इंग्रजी ही घरातील अथवा समाजातील भाषा नसल्यामुळे मुले मुली इंग्रजीतून शिकताना अनेक अडचणींना तोंड देतात. हे तर आहेच. परंतु मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमाच्या शाळा या भारतीय संस्कृती, परंपरा यापासून दूर गेलेल्या आढळतात. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींना भारताची परंपरा ,संस्कृती, इतिहास यांची माहिती फारशी असत नाही. भारताचे सांस्कृतिक संचित त्यांच्यापर्यंत पोचत नाही. यातूनच मी वर दिलेल्या संवादासारखे संवाद घडतात. काही वर्षांपूर्वी आमच्या महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्याशी झालेला संवाद वर दिला आहे. नंतर त्या विद्यार्थ्याला मी थोडक्यात चांगदेव यांच्याबद्दलची माहिती सांगितली. पण असे प्रसंग अनेकवेळा घडतात. आमच्या एका विद्यार्थ्याचे नाव अनिरुद्ध होते. मी त्...