थोडी धडपड तहानलेल्यांसाठी...
एप्रिल २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आमच्या म.ए.सो.संस्थेच्या पुण्यातील शाखांनी दुष्काळ निवारण निधी गोळा करण्याचा कार्यक्रम ठरवला. आमच्या गरवारे महाविद्यालयानेदेखील त्यात सहभाग घेतला. तो आठवडाभर आम्ही सगळे त्या धावपळीत होतो. रस्त्यावर स्टॉल लावणे, पत्रके वाटणे, कॉलेजमध्ये वैयक्तिक भेटून, बैठकांमध्ये आवाहन करणे असे वेगवेगळया पद्धतीने प्रयत्न केले गेले.अनेकजण यामध्ये सहभागी झाले.रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांनी निधी कलशात टाकलेल्या पैशांपासून अनेकांनी आपणहून दिलेल्या रोख रकमा आणि धनादेशापर्यंत अनेक मार्गांनी निधी गोळा झाला. अनेक नवनवे अनुभव मिळाले. या आठवड्यातील कौटुंबिक समाधानाचा एक दिवस... दुष्काळग्रस्तांसाठी निधी संकलनाचा सप्ताह सुरू झाला. रात्री होस्टेलच्या मुलांबरोबर बसून स्टॉलच्या कामाचे नियोजन केले. जवळपास ६-७ तास त्या कामात गेले. या कामात नियोजनापासून ते स्टॉलच्या कामात माझी पत्नी सौ.शैलजा आणि मुलगा शंतनू यांचा सक्रीय सहभाग होता. स्टॉलच्या कामात तर त्यांनी भाग घेतलाच पण त्याचबरोबर दोघांनीही आपापल्या पैशातून दुष्काळग्रस्त...