Posts

Showing posts with the label समर्थ भारत

समर्थ भारत : जवळ तरीही दूर

Image
          गेल्या काही दिवसातील अनेक बातम्यांनी मनावरती ओरखडे उमटवले. काही बातम्यांनी तर मनावरती घाव घातले. खरोखरंच आपण एक देश समाज म्हणून समर्थ होण्याच्या किती जवळ आहोत अथवा किती लांब आहोत याची जणू माहिती या बातम्यांनी दिली.                   (कल्पनाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)          यातील पहिली बातमी ही पुणे शहराजवळच्या शिरूर या महामार्गावरील गावामधील आहे. या बातमीनुसार वंचित समाजातील एका जोडप्यातील महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली. काय करावे हे न कळून दोघेही सुन्नपणे तसेच बसून राहिले. काही संवेदनशील लोकांनी गावातील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांना तातडीने बोलावून घेतले. ते पती-पत्नीदेखील तत्परतेने तिथे हजर झाले आणि त्यांनी आवश्यक त्या वैद्यकीय उपचार केले. या बातमीत सर्व संबंधितांची तत्परता अभिनंदनीय आहे. माणुसकीचे दर्शन घडवणारी आहे. परंतु त्याच वेळी या बातमीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्या देशात सरकारी रुग्णालयात निःशुल्क उपचार होतात हे या जोडप्याला माहीत नव्हते का? माहित अ...

विश्वबंधुत्व दिन

Image
     ११ सप्टेंबर १८९३ या दिनांकाने इतिहासात आपली नोंद अजरामर करून ठेवली आहे. याच दिवशी अमेरिकेत शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेच्या उद्घाटन प्रसंगी स्वामी विवेकानंद यांनी उच्चारलेल्या , "अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो!" या शब्दांनी उपस्थित हजारो श्रोत्यांच्या हृदयाची तार छेडली गेली, नसानसातून विद्युत संचार झाला, मनाची स्पंदने जुळली. या परिषदेच्या एक दिवस आधी आगगाडीच्या डब्यामध्ये अनामिकपणे रात्र घालवलेल्या स्वामीजींवर जणू प्रसिद्धीचा प्रखर झोत पडला. स्वामीजींच्या या शब्दांचा प्रभाव इतका का पडला? याचे कारण स्वामीजींचे शब्द हे मनापासून उच्चारलेले होते. जे पोटामध्ये होते तेच ओठांवर आले.‌ स्वामीजींनी अन्य एके ठिकाणी म्हटले आहे, " शब्दांचा प्रभाव हा एक तृतीयांश असतो तर व्यक्तिमत्त्वचा प्रभाव दोन तृतीयांश असतो. " स्वामीजी उदार, व्यापक व्यक्तिमत्त्व असल्यानेच शब्दांचा हा विलक्षण प्रभाव पडला. ( जागतिक सर्वधर्मपरिषदेचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         स्वामी विवेकानंद यांच्या या छोट्याशा भाषणात साधारणपणे पाच मुद्दे होते. पहिला म्हणजे स्वागताबद्...

मानसिक गुलामगिरीच्या खुणा

Image
      मध्यंतरी एका भारतीय व्यक्तीचे भाषण ऐकत होतो. इंग्रजीमध्ये हे भाषण होते.‌ बोलत असताना त्यांनी 'जगरनॉट' हा शब्द वापरला. मला लक्षात आले की 'जगन्नाथाचा रथ' यावरून इंग्रजी भाषेत हा शब्द घेण्यात आला आहे. इंग्रजांना जगन्नाथ हा शब्द उच्चारायला अवघड जात असे त्यामुळे जगरनॉट असा शब्द त्यांनी तयार केला. परंतु भारतीयांना जगन्नाथ हा शब्द उच्चारणे सहज जमते. इंग्रज या देशातून गेले याला ७५ पेक्षा जास्त वर्षे झाली. तरीदेखील आपला शब्द आपल्या पद्धतीने न ऊच्चारता तो इंग्रजांच्या पद्धतीने उच्चारतो.     असेच उच्चारले जाणारे आणखी काही शब्द आहेत. उदाहरणार्थ योगा, आयुर्वेदा, रामा, गॅंजेस, इ. इंग्रजांनी  हे शब्द जरी भारतीय असले तरी त्यांच्या सोयीसाठी ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने उच्चारायला सुरुवात केली. आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना एका अर्थाने पर्याय नव्हता.  स्वातंत्र्यानंतर आपल्यावर इंग्रजांचे कोणतेही बंधन नाही त्यामुळे हे शब्द भारतीय पद्धतीने उच्चारणे सुरू व्हायला हवे होते. परंतु तसे झाले नाही. याचे कारण काय तर 'इंग्रज गेले पण इंग्रजीपणा इथे सोडून गेले'. याल...

समर्थ भारतासाठी युवाशक्ती

Image
 "आपली प्रिय भारत माता पुनश्च एकदा विश्वगुरूच्या सिंहासनावर विराजमान होईल आणि जगतास अभय प्रदान करील" स्वामी विवेकानंद यांचे वचन आहे. हे वचन साकार करण्यासाठी युवाशक्ती महत्त्वाची आहे. भारताचे हे ध्येय साकार करण्यासाठी या युवापिढी मध्ये कोणकोणते गुण असावेत याचा आपण विचार करूया.        सर्वात प्रथम राष्ट्र जे घडवू शकतात असे युवक आपापल्या क्षेत्रांमध्ये निष्णात असण्याची आवश्यकता आहे. यासाठी सातत्यपूर्ण कठोर असे परिश्रम करून युवकांनी ही निपुणता मिळवावयास हवी. ही निपुणता मिळवता आला कोणत्याही लघु मार्गाचा (शॉर्टकटचा) अवलंब करून चालणार नाही त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे.        ज्या वेळेला समाजाचे व राष्ट्राचे काम करावयाचे असते त्या वेळी कोणा एका व्यक्तिचे परिश्रम त्यासाठी पुरेसे पडत नाहीत. त्यामुळे अशा कर्तृत्ववान व उत्साही व्यक्तींनी एकत्र येऊन समाजाचे काम पुढे नेले पाहिजे. यासाठी या युवकांमध्ये संघभावना असण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे. केवळ मीच पुढे होईन वा मीच एकटा सर्व करेन ही भावना सामाजिक कामामध्ये उपयोगाची नसते. त्यामुळे युवकांच्या मनामध्ये ह...

आपली शाळा आपल्याला काय काय शिकवते?

आपली शाळा आपल्याला काय काय शिकवते असा विचार केला की अनेक गोष्टी लक्षात येतात. शाळा आपल्याला शिकवते की कठोर परिश्रम, सततची मेहनत करत राहिलो तरच यशाची नवनवीन शिखरे आपण गाठत राहू. ही यशाची शिखरे गाठत असताना आपल्या मर्यादांची जाणीव ठेवत आपण स्वतःवर विश्वास ठेवू. आधुनिक जगात बाह्य स्पर्धा कितीही वाढली असली किंवा तसे वाटत असले तरी खरी स्पर्धा स्वतःशीच असते. कारण स्वतःच स्वतःला नवनवीन आव्हानांसाठी तयार करायचे असते. हे करत असताना स्वतःची काही तत्वे, मूल्ये निश्चित करत ती सदैव स्वतःकडून पाळली जातील याची काळजी घ्यायची असते.वेळोवेळी या मूल्यांवर ठाम राहण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यात कोणतीही कुचराई करायची नसते. कोणतेही यश मिळवणे आणि ते खूप काळ टिकवून ठेवणे यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच्या विश्वासू सोबत्यांची, सहकाऱ्यांची आवश्यकता असते. या सर्व सहकाऱ्यांबरोबर स्वतः एकसंघ भावनेने काम करण्याची आवश्यकता असते.  शाळेतील वर्षे ही हसण्याची, खेळण्याची , नवनवीन गोष्टी शिकण्याची आहेत. आपल्या संस्थेच्या शाळेत शिकत असताना संस्थेच्या आणि शाळेच्या प्रदीर्घ इतिहासाची आपल्याला ओळख होते. या वारशाची जाणीव...