Posts

Showing posts with the label मो. जिना

फाळणीची पार्श्वभूमी सांगणारे आणि अखंड भारत होण्यासाठी कार्यक्रम सुचवणारे पुस्तक

Image
    १९४७ मध्ये भारताची फाळणी का झाली , गोष्टी कोणत्या क्रमाने बिघडत गेल्या याची कारण मीमांसा करणारे आणि पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ , भूतान यासह आजचा भारत राज्य म्हणून एकत्र न येताही तो संस्कृतिक आधारावर अखंड भारत कसा होऊ शकतो याचे स्पष्टीकरण देणारे पुस्तक म्हणजे भारतीय विचार साधना पुणे यांनी प्रकाशित केलेले 'प्रत्येक राष्ट्रभक्ताचे स्वप्न अखंड भारत' हे डॉ. सदानंद दामोदर सप्रे यांनी मूळ हिंदीत लिहिलेल्या पुस्तकाचा श्री.चित्तरंजन भागवत यांनी केलेला केलेल्या मराठी अनुवादाचे ११६ पानांचे पुस्तक. भारतावर सुमारे दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांनी कोणत्या प्रकारे आपली सत्ता स्थिर ठेवली आणि हा देश सोडून सात असताना रक्तरंजित फाळणी कशी घडवून आणली याचे विवेचन या पुस्तकात वाचायला मिळते.  या पुस्तकाचे दोन भाग करण्यात आले आहेत. भाग एक 'फाळणी का व कशी झाली.' हा आहे. तर भाग दोन 'भारत अखंड कसा होईल?' हा आहे. पहिल्या भागात १७ मुद्द्यांच्या आधारे फाळणीचा घटनाक्रम उलगडून दाखवलेला आहे तर दुसऱ्या भागात १९ मुद्द्यांद्वारे भारत अखंड कसा होईल याचे विवेचन केलेले आहे. साधारणपणे जनसामान...