Posts

Showing posts with the label अन्नदान

अन्नविचार

    २०१३ साली स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्यासंबंधी लिहिलेल्या आणि त्यांच्या व्याख्यानांच्या काही पुस्तकांचे वाचन केले. त्यात एक पुस्तक वेगळेपणाने लक्षात राहिले ते श्री.शंकर यांचे " अज्ञात विवेकानंद " हे पुस्तक. त्यात विवेकानंद बद्दल वेगवेगळी माहिती लिहिली आहे. त्यातील एक प्रसंग. एकदा विवेकानंदांनी गमतीने आपल्या शिष्यांना विचारले की जगात असा कोणता देश आहे जिथे साधू,  राजा आणि आचारी यांना एकच शब्द आहे. नंतर त्यांनी स्वतःच उत्तर दिले की आपला भारतच तो देश आहे. ' महाराज ' या शब्दाने आपल्याकडे या तिघांनाही संबोधले जाते. याच पुस्तकात असा उल्लेख आहे की स्वामीजींच्या लहानपणी त्यांच्या घरी आणि बहुधा त्यांच्या परिचितांच्या घरी जेवताना पाणी उजव्या हाताने प्यायची पद्धत होती. स्वामीजींनी खटपट करून ही पद्धत बदलली.        गुणांचा सागर असलेल्या स्वामीजींना स्वतः स्वयंपाक करून आग्रहपूर्वक आपले गुरूबंधू आणि शिष्य यांना खाऊ घालायला आवडायचे. बेलूर येथील मठाचे बांधकाम चालू असताना स्वामीजींनी तिथे काम करणाऱ्या संथाळी मजूरांना एके दिवशी बोलावून आग्र...