गुरूंची सदैव सोबत
" माझे गुरु हे ज्ञानरूप आहेत आणि मी त्यांचा भक्त आहे. माझ्याकडून जे काही चांगले बोलले गेले याचे सर्व श्रेय त्यांनाच आहे." असे विनम्र उद्गार स्वामी विवेकानंद यांनी काढले आहेत. संत तुकाराम आपल्या एका अभंगात असे म्हणतात, " जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरूनिया " या ओळींचा अनुभव स्वामीजींना सदोदित आला. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) स्वामीजींचे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या घशाच्या कर्करोगाचे निदान १८८५ मध्ये झाले आणि उपचारांसाठी त्यांना कोलकात्यामधील काशीपूर उद्यानात ठेवण्यात आले. त्यांच्या निधनाच्या काहीच दिवस अगोदर श्रीरामकृष्णांनी नरेंद्रला, म्हणजेच स्वामीजींना, आपल्याजवळ बोलावले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून स्वतःच्या ठायी असणाऱ्या सर्व शक्ती स्वामीजींमध्ये संक्रमित केल्या. हे केल्यानंतर श्रीरामकृष्ण असे म्हणाले की ," नोरेन आता तुला मी सर्व काही देऊन फकीर झालो आहे." श्रीरामकृष्णांचे निधन झाल्यानंतर त्यांची तरुण शिष्य मंडळी वराहनगर येथील मठात एकत्रित राहू लागली. परंतु स्वामीजींना अद्याप आपल्या जीवित कार्याची पु...