Posts

Showing posts with the label संत एकनाथ

हिंदूं समाजाच्या भाव जागरणाचा स्पृहणीय प्रयत्न

Image
       अंधारलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर दिवे उजळले. जवळपास हजार डोळे समोर खिळले आणि सुस्वरात आरती सुरू झाली.  नमोस्तुते जय देवी सुर सरिते गोदावरी माता | कैसै हो वर्णित शब्दों मे तव गाथा ||  ( छायाचित्र कु. सिद्धांत उपासे )          मानवी जीवनाचा प्रवाह हजारो शतक वर्षांपासून या भारत भूमीमध्ये अखंडित वाहत आलेला आहे. या भारतभूमीविषयी ज्यांची भक्ती आहे असा हिंदू समाज आपल्या परंपरेचे पालन आजदेखील करत आलेला आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी बुद्धी आणि भावना यांचा प्रभाव दिसतो. बऱ्याच वेळा असे दिसते की या दोघींपैकी कोण वरचढ ठरणार त्यावर निर्णय होतो. साधारणपणे उचंबळून आलेल्या भावना माणसाला विलक्षण गोष्टी करायला भाग पाडतात. अनेक वेळा अशा गोष्टी माणसाचे आयुष्य वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. त्यामुळे या भावनांची जोपासना करणे, त्यांचे जागरण करणे आणि त्यांना योग्य दिशेने प्रवाहित करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. हिंदू संस्कृती हजारो वर्षांची असल्याने अनेक प्रथा परंपरा काळाच्या ओघात उदयाला आल्या. त्यापैकी काही स्थिर झाल्या तर काही काळाच्या प्रवाहात ...

मी शिकलो मराठवाड्यातील शब्द

  " नीट जायचं." समोरचा माणूस म्हणाला आणि बुचकळ्यातच पडलो. संघाच्या कामासाठी दोन वर्षे (जून१९९७- जून१९९९) मराठवाड्यात राहण्याचा योग आला. या काळात तिथले नवनवीन शब्द मला शिकायला मिळाले. एकदा एके ठिकाणी मी रस्ता विचारण्यासाठी थांबलो. तर समोरच्या माणसाने उत्तर दिले ,"नीट जायचं." मी सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातला. मी विचार केला, अरे मी तर नीटच (व्यवस्थित) चाललोय. वेडावाकडा नाही. नंतर उलगडा झाला नीट जायचं म्हणजे सरळ जायचं. बरेच वेळा अनेक जण सांगायचे, "इथेच आमचा ठेपा असतो." ठेपा म्हणजे अड्डा हे कळायला मला बरेच दिवस गेले. नंतर मी ही म्हणू लागलो की ,"तुम्ही ठेप्यावर भेटला नाहीत." ठेपा यासारखा मोंढा हा देखील एक शब्द लक्षात राहिला. मोंढा म्हणजे घाऊक खरेदी-विक्री बाजारपेठ. सातारा जिल्ह्यात सहजपणे म्हटलं जातं ,'काय करतो तुमचा पोरगा". पण मराठवाड्यात 'लेकरू'हा शब्द सहजपणे जास्त वापरला जातो. नंतर लक्षात आलं की समर्थ रामदास हे मराठवाड्यातील त्यामुळे त्यांच्या रचनेत 'लेकरू' शब्द आढळतो ," जननी जनक माया लेकरू काय जाणे?" ...