समाजाच्या प्रगतीचा यज्ञ करत राहणारे श्री. विजयराव पंडित
"अरेरे, किती लागलंय त्याला!" अपघात झालेल्या ठिकाणी जमलेले सगळेजण फक्त हळहळ व्यक्त करत होते पण मदत करायला कुणीच पुढे येत नव्हते. अशावेळी तरुण विजयराव पंडित पुढे आले आणि त्यांच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले. त्यावेळी त्यांच्या मदतीला आले होते अच्युतराव पोतदार. (श्री.विजयराव पंडित हे प्रा.अविनाश सुतार यांचे स्वागत करताना) विजयराव बालपणापासूनच संघाच्या शाखेत जायचे. शाखेची जबाबदारी घेऊन कामही केले पण कराडच्या अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर मात्र संघाशी संबंध राहिला नाही. पुढे सरकारच्या पाटबंधारे खात्यात नोकरी मिळाली आणि त्यावेळच्या नियमानुसार तर सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कामात भाग घ्यायला बंदी होती. त्यामुळे तर अजूनच संबंध संपला. जातायेता काही चौकशी करणं यापलीकडे फार काही संबंध राहिला नाही. पण आधी सांगितलेला प्रसंग १९७६-७७ च्या सुमारास घडला आणि आयुष्याने वेगळे वळण घेतले. त्या प्रसंगी सोबत असलेले अच्युतराव हे संघाचे कार्यकर्ते होते. त्यांच्या प्रयत्नांमधून विजयराव सरकारी नियमांची पर्वा न करता पुन्हा एकदा संघाच्या ...