गुणग्राहक राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज हे बहुमुखी प्रतिभेचे धनी होते. सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेली अजोड कामगिरी तर सर्वांना माहिती आहेच. असे हे शाहू महाराज हे कलाकारांची माणसांची कदर करणारे होते. आपल्या माणसांना ते सर्व प्रकारचे सहाय्य करत असे. शाहू महाराज हे नाटकांचे चाहते होते. प्रसिद्ध नाटककार गोविंदराव टेंबे यांना एका नाटकासाठी मोर्चेल वगैरे साहित्याची आवश्यकता होती.त्यांनी महाराजांची भेट घेतली. महाराजांच्या कानावर अडचण घातली. महाराजांनी विचारलं हे साहित्य कुठे मिळेल? टेंबे म्हणाले , "महाराज आपल्या वाड्यातच". महाराजांनी सांगितले की, " जा काळजी करू नकोस". प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळेला महाराजांनी राजवाड्यातील साहित्य पोच केले. स्वतः देखील प्रयोग पाहण्यासाठी उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले. ( गोविंदराव टेंबे ) महार...