Posts

Showing posts with the label पुरूषी वर्चस्ववादी मानसिकता

स्त्री सन्मान राखण्यासाठी

Image
        गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात विविध ठिकाणी घडलेल्या मुली महिला यांच्यावरील अत्याचारांच्या बातम्या सातत्याने वाचायला मिळत आहेत. या बातम्या वाचून दुःख होते. वेदना होतात. सात्विक संतापदेखील उत्पन्न होतो. या बातम्यांमध्ये पश्चिम बंगालमधील डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्याची बातमी किंवा बदलापूर येथील शाळेतील अगदी लहान वयातील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची बातमी केरळमध्ये चित्रपटसृष्टीत महिलांचे पद्धतशीरपणे लैंगिक शोषण करण्याची यंत्रणा चालते असे निरीक्षण नोंदवणारा न्यायमूर्ती के. हेमा यांचा अहवाल अशा अनेक बातम्या आहेत.     ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )        अशा घटना घडल्या की काही प्रमाणात त्या झाकून ठेवण्याकडे कल असतो. कारण साधारणपणे आपल्याकडे अत्याचार करणाऱ्या पुरुषांपेक्षा जिच्यावर अत्याचार झाला आहे अशा स्त्रीची जास्त बदनामी झाली असे मानले जाते. तिला पुढील आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही सर्वेक्षणात तर जवळच्या नात्यातील पुरुषांनीच अत्याचार केला दिसून आले आहे. अशा घटनांमध्ये तर...