Posts

Showing posts with the label क्रिकेट

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

Image
      " सर, दुसऱ्या एखाद्या पालकांनी परीक्षेचा पेपर बुडवून विश्वचषकाचा सामना बघायला जाण्याची परवानगी मुलाला दिली असती तर मी त्यांना  भेटायला बोलावले असते. पण मी तुम्हाला ओळखतो त्यामुळे बोलावले नाही." आमच्या शंतनूचे महाविद्यालयातील प्राध्यापक संदीप राठोड‌सर मला सांगत होते. झालं होतं असं की क्रिकेट विश्वचषकाच्या पुण्यातील ऑक्टोबर २०२३ मधील सामन्याची तिकिटे शंतनूने खटपट करून इंटरनेटवरून मिळवली होती. पण नंतर परीक्षांचे वेळापत्रक बदलले आणि शंतनूचा एक पेपर सामन्याच्या दिवशीच आला होता. तेव्हा पुढील प्रयत्नात हा पेपर सोडवायचा या बोलीवर मी शंतनूला सामना बघायची परवानगी दिली होती. त्यानंतर हे बोलणे झाले.              ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)               या प्रसंगाने मनात विचार आला की सलग शिक्षण होणं किती महत्त्वाचे आहे किंवा तेच महत्त्वाचे आहे का?       माझ्या स्वतःच्या जन्मदिनाकांची नोंद चुकीची झाल्याने मी सहा महिने आधीच शाळेत दाखल झालो. पण पहिल्या वर्षात अभ्यासाची गोडी लागलीच नाही. त्...