तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनाचा संदेश
भारतीय समाजजीवनाच्या प्राचीन इतिहासात अनेक महान व्यक्तिंनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आपल्या योगदानाने त्यांनी भारत भारताच्या प्राचीन इतिहास परंपरेत अनेक महान व्यक्तिंनी समाजजीवनाला महत्त्वाचे वळण दिले आहे. अशा महान व्यक्तिंपैकी तथागत गौतम बुद्ध हे महत्त्वाचे आहेत. कर्मकांड याचा अतिरेक असलेल्या समाजाला लोक भाषेत समजावून नीतिमूल्यांची चौकट बळकट करण्यात गौतम बुद्धांनी आपले योगदान दिले. हे योगदान देत असताना गौतम बुद्धांनी वेगवेगळ्या पद्धतीने समाजाला व्यक्तींना मार्गदर्शन केले. ज्याप्रमाणे एखादा चांगला शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची पात्रता ओळखून त्यानुसार त्याला मार्गदर्शन देतो त्याच प्रमाणे गौतम बुद्धांचे बुद्धांनी देखील समोरील व्यक्तीची पार्श्वभूमी पात्रता पाहून उपदेश केला. उद्धटपणाने त्यांच्याशी बोलणाऱ्या एका शेतकऱ्याला त्यांनी सांगितले, "भ्रांत झालेल्या माणसांची अंत:करणे हे माझे शेत, प्रज्ञा माझा नांगर, वीर्य हा बैल, धर्म हा दंड आणि श्रद्धा हे बीज आहे. चोहीकडे ज्ञानरूपी नांगर फिरवून अज्ञानरूपी कंटक काढून टाकतो व तिथे श्रद्धेचे बी पेरतो. या माझ्या शेतात कामाला जे फळ येते त्...