मला लाभलेले भाषा शिक्षक
लहानपणापासूनच मला भाषा विषयाचीसुद्धा आवड होती. मी भाग्यवान आहे असं मला वाटतं कारण मला लाभलेले भाषा शिक्षक अतिशय चांगले होते. साखरवाडी विद्यालय साखरवाडी प्राथमिक विभाग या शाळेत असताना इयत्ता चौथीपर्यंत आम्हाला गोसावीबाई होत्या. शिक्षणशास्त्राच्या पद्धतीप्रमाणे उत्साहाने त्या शिकवत. त्यामुळे भाषेची ,कवितेची गोडी लागली. पाचवीला साखरवाडी विद्यालय साखरवाडी माध्यमिक विभाग या शाळेत प्रवेश घेतला. तिथे भाषा विषयासाठी आम्हाला खूप चांगले शिक्षक होते. मातृभाषा मराठी शिकवणारे ल.क. देशपांडे सर, ऐनापुरे बाई, हिं दी भाषा शिकवणारे श्री.व्यं. कुलकर्णी सर ( नेहमी अनमोल घडी चित्रपटाचं उदाहरण देऊन वेळेचं महत्त्व सांगायचे), न रगुंदेबाई, वीरकर बाई, इंग्लिश भाषा शिकवणारे न .चिं.बर्वे सर, स.रा. बोकील सर, श्रद्धा वाळिंबे बाई अ से सर्व भाषा शिक्षक आम्हाला समरसून शिकवायचे. या सर्वांवर मी छोटे छोटे लेख लिहिले आहेत. या सगळ्या शिक्षकांमुळे पाठ्यपुस्तकातील धडे कविता याबरोबरच अन्य पुस्तकांच्या वाचनाची देखील गोडी लागली आणि ती वाढतच गेली. अकरावी-बारावीला पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकत असताना आम...