Posts

Showing posts with the label हेल भगिनी

युगनायकाचा जिव्हाळा

Image
         ' दुरून डोंगर साजरे ' अशी एक म्हण आहे. काही मोठी माणसे दुरूनच चांगली वाटतात परंतु जर त्यांच्याजवळ जाण्याचा प्रसंग आला तर त्यांच्यामधील सवयी या आपल्याला चांगल्या वाटत नाहीत असा या म्हणीचा आशय आहे. तसेच जी माणसे अतिशय बुद्धिमान असतात, ज्ञानमार्गी असतात ती अनेकदा इतरांशी रूक्षपणे वागताना दिसतात. परंतु याला अनेक अपवाद आहेत. यापैकी एक अपवाद म्हणजे युगनायक स्वामी विवेकानंद हे होत.        १८९३ मध्ये शिकागो येथील सर्व धर्म परिषदेच्या वेळी स्वामीजींची राहण्याची व्यवस्था जॉन लेयॉन या धनवंतांच्या घरी करण्यात आली होती. स्वामीजींना या घरात आपुलकीचा अनुभव आला. ते जॉन लेयॉन यांच्या पत्नी श्रीमती एमिली लेयॉन यांना मदर असे संबोधत. त्यांची नात कॉर्नेलिया कॉंगर हिने नंतर आपल्या आठवणी लिहून ठेवल्या. १८९३ मध्ये कॉर्नेलिया ही सहा वर्षांची होती. स्वामीजी तिच्याशी अगदी सहजपणे संवाद साधत. ती त्यांच्या मांडीवर बसत असे. त्यांना गोष्ट सांगण्याचा हट्ट करत असे. स्वामीजी ही तिचा हट्ट पुरवीत. वेगवेगळ्या गोष्टी ते तिला सांगत असत. भारताचे वर्णन करून सांगत असत.  ...