Posts

Showing posts with the label समर्थ रामदास

छ. शिवराय : अखिल भारतीय दृष्टी

Image
     भारताचा मध्ययुगीन इतिहास लिहिताना तुर्क, पठाण, मोगल, इंग्रज, फ्रेंच इत्यादी लुटारू आक्रमकांच्या दृष्टीने लिहिला गेल्याचे आढळते. त्यामुळे ही तत्कालीन आक्रमक मंडळी छ. शिवाजी महाराजांना बंडखोर, लुटारू अशी विशेषणे वापरत असत. जणू काही ते स्वतःच इथले मालक आहेत असा हा आविर्भाव. चोराच्या उलट्या बोंबा त्या ह्याच! छत्रपती शिवरायांचा लढा हा भूमिपुत्रांचा लढा असून तो स्वातंत्र्यलढा आहे ही भूमिका त्यांनी कधीच मान्य केलेली दिसत नाही. तसेच महाराजांचे विचार, दृष्टी महाराष्ट्रपुरती किंबहुना त्यांच्या ताब्यात असलेल्या महाराष्ट्राच्या, तामिळनाडूच्या आणि कर्नाटकाच्या काही भूमिपुरती मर्यादित होती अशीदेखील समजूत दिसते.             ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)  परंतु महाराजांची दृष्टी ही केवळ आपल्या ताब्यातील भूप्रदेशाएवढीच मर्यादित नव्हती तर ती अखिल भारतीय होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे. याचे अनेक पुरावे देता येतील. ॲबे बार्तुलमी कॅरे नावाचा एक युरोपियन प्रवासी शिवाजी महाराजांच्या जीवित काळात दोन वेळा भारतात प्रवास करण्यासाठी आला होता. त्याने आपल्या आ...

मी शिकलो मराठवाड्यातील शब्द

  " नीट जायचं." समोरचा माणूस म्हणाला आणि बुचकळ्यातच पडलो. संघाच्या कामासाठी दोन वर्षे (जून१९९७- जून१९९९) मराठवाड्यात राहण्याचा योग आला. या काळात तिथले नवनवीन शब्द मला शिकायला मिळाले. एकदा एके ठिकाणी मी रस्ता विचारण्यासाठी थांबलो. तर समोरच्या माणसाने उत्तर दिले ,"नीट जायचं." मी सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातला. मी विचार केला, अरे मी तर नीटच (व्यवस्थित) चाललोय. वेडावाकडा नाही. नंतर उलगडा झाला नीट जायचं म्हणजे सरळ जायचं. बरेच वेळा अनेक जण सांगायचे, "इथेच आमचा ठेपा असतो." ठेपा म्हणजे अड्डा हे कळायला मला बरेच दिवस गेले. नंतर मी ही म्हणू लागलो की ,"तुम्ही ठेप्यावर भेटला नाहीत." ठेपा यासारखा मोंढा हा देखील एक शब्द लक्षात राहिला. मोंढा म्हणजे घाऊक खरेदी-विक्री बाजारपेठ. सातारा जिल्ह्यात सहजपणे म्हटलं जातं ,'काय करतो तुमचा पोरगा". पण मराठवाड्यात 'लेकरू'हा शब्द सहजपणे जास्त वापरला जातो. नंतर लक्षात आलं की समर्थ रामदास हे मराठवाड्यातील त्यामुळे त्यांच्या रचनेत 'लेकरू' शब्द आढळतो ," जननी जनक माया लेकरू काय जाणे?" ...