स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही अद्भुत प्रसंग.. (भाग १)
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात २३,२४ आणि २५ डिसेंबर १८९२ हे तीन दिवस महत्त्वाचे होते. आपले गुरू रामकृष्ण परमहंस यांनी कोणते कार्य करायला सांगितले याचा शोध घेत कलकत्त्यातून बाहेर पडून भारताची परिक्रमा करून स्वामीजी कन्याकुमारी येथे पोचले. नावाड्याला देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून समुद्रातून पोहत जात श्रीपाद शिलेवर बसले. ध्यान लावले.
( स्वामी विवेकानंद )
तीन दिवस ध्यानावस्था राहिली आणि या ध्यानावस्थेत जीवित कर्तव्याचा साक्षात्कार त्यांना झाला. म्हणून ही लेखमाला. आज या शिलेवर विवेकानंद शिला स्मारक उभे आहे.
( विवेकानंद शिला स्मारक )स्वामीजींचे जीवन निःसंशयपणे प्रेरणादायक आहे. एका व्यक्तीच्या जीवनाबद्दल किती प्रकारे बोलता सांगता, अभ्यासता आणि अनुकरण करता येईल याचे हे विलक्षण उदाहरण आहे. साधारणपणे स्वामीजींचे शिकागोचे ११/०९/१८९३ चे भाषण किंबहुना त्यातील सुरुवातीचे संबोधन हे बहुतेक वेळा माहीत असते. परंतु स्वामीजींच्या जीवनातील अनेक प्रसंग फार माहिती असत नाहीत. त्यामुळे या विषयावर लिहावं असं बरेच दिवस मनात होतं. आता ते लिहितो आहे. स्वामीजींचे नाव त्यांचे वडील बाबू विश्वनाथ दत्त यांनी नरेंद्र असे ठेवले होते तर त्यांच्या आई भुवनेश्वरी देवी यांनी हा मुलगा आपल्याला शंकराच्या वरामुळे झाला या श्रद्धेने वीरेश्वर ( शंकराचे एक नाव) असे ठेवले होते.( बंगालीमध्ये 'व'चा 'ब' होतो म्हणून बीरेश्वर. प्रेमाने आई बिले म्हणत असे.)
Yes it is there.Actually my topic of research for M.phil was also Swami Vivekananda : As a Man of Letters.
ReplyDelete