घड्याळाची टिकटिक

मध्यंतरी एकदा रस्त्याने जात होतो. निघायला तसा थोडासा उशीर झाला होता. आता किती वाजले असतील याचा अंदाज घ्यायचा म्हणून मनगटाकडे बघायला लागलो. पण लक्षात आलं की आपण रेनकोट घातलाय. त्यामुळे घड्याळ दिसणार नाही. आजूबाजूला नजर गेली पण जवळपास कुणाच्या हातावर घड्याळ दिसलं नाही. नंतर जिथे पोहोचायचं तिथं पुरेसा वेळेवर पोहोचलो. ( एका समारंभाच्या निमित्ताने आप्तांनी भेट दिलेली घड्याळे 🙂) यानिमित्ताने मनात विचार चक्र सुरू झाले आमचे वडील कै. बापू यांना घड्याळाचे फार वेड होते. वेळेचेही तसे ते खूप पक्के होते. साखरवाडीसारख्या छोट्या गावातही वेळ सांगताना १० वाजून २४ मिनिटे अशा प्रकारे ते वेळ सांगायचे. एक चावीचे घड्याळ भिंतीवर त्यांनी लावलं होतं. अनेक वर्ष ते घड्याळ आमच्या दुकानाच्या भिंतीवर होते. दररोज ठराविक वेळेला त्याला चावी देणे, ते आपल्या जागेपासून हललं नाही ना याची खात्री करणे असा त्यांचा नेहमीचा क्रम होता. घरातून बाहेर पडताना हातावरही ते घड्याळ बांधल्याशिवाय कधीच बाहेर पडत नसत. मनगटावर घड्याळाची डायल न बांधता ते विरुद्ध बाजूला बांधायचे. जाता येता ...