Posts

Showing posts with the label विवेक

संघाचे प्रचारक

Image
      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी पूर्ण होत असताना संघाबद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे. तसे कुतूहलदेखील मोठ्या प्रमाणावर आहे. संघाचे काम चालते कसे त्याचा विस्तार कसा होतो गेला याबाबत देखील बऱ्याच जणांना माहिती हवी असते. संघ कामाच्या वेगवेगळ्या पैलूंपैकी संघाची असलेली प्रचारक यंत्रणा हा एक महत्त्वाचा घटक आहे.              ( पुस्तकाचे मुखपृष्ठ )         भारताच्या प्राचीन परंपरेमध्ये हजारो वर्षापासून संन्यासी वर्गाचा उदय झालेला  बघायला मिळतो. लौकिक जीवनापासून दूर राहून परमेश्वर प्राप्तीसाठी निरंतर साधनारत असणारे अगणित साधू,संन्यासी होऊन गेले. असेच जीवन जगणारे अनेकजण आजही आहेत. या परंपरेचा धागा काही अंशाने संघाच्या प्रचारक व्यवस्थेत बघायला मिळतो. आपले कुटुंब, लौकिक आकांक्षा यांचा त्याग करून संघाच्या योजनेनुसार सांगितलेल्या ठिकाणी सांगितलेल्या पद्धतीचे पूर्ण वेळ काम करणाऱ्या  संघाच्या स्वयंसेवकांना 'प्रचारक' असे म्हणतात. यातील बरेच जण काही वर्षे 'प्रचारक' म्हणून संघकाम करतात आणि नंतर आपापल्या व्यावहारिक गरज...