छोट्या गोष्टीतील बारकावा
अनेकदा असे वाटते की छोट्या छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या नाहीत. त्यामुळे त्या कशाही केल्या अथवा थोडेफार दुर्लक्ष झाले तरीदेखील काही फरक पडत नाही. परंतु असे नाही. इंग्लिश भाषेतील एक जुनी कविता आहे. For want of a nail the shoe was lost; For want of a shoe the horse was lost; For want of a horse a rider was lost; for want of a rider a battle was los; For want of a battle a kingdom was lost; And all this was for a want of a nail. अर्थात घोड्याच्या नालेच्या खिळ्यासारख्या छोट्या गोष्टीकडे वेळेवर लक्ष न दिल्याने राज्य लयास गेले. मोठी माणसे त्यांच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींकडे अतिशय बारकाईने लक्ष देतात आणि म्हणूनच ते आयुष्यात मोठ्या भव्य गोष्टी करू शकतात. प्रख्यात कलाकार, नाट्य दिग्दर्शक कै. विजयाबाई मेहता यांनी त्यांच्या 'झिम्मा' या आत्मचरित्रात एक प्रसंग सांगितला आहे. मुंबईमध्ये टाटा ग्रुप यांच्यावतीने 'नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ची' (NCPA) स्थापना करण्यात आली...