साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग ( भाग ८ )
प.अ. वीरकरबाई शाळेतील दिवस हे मंतरलेले असतात याची जाणीव शाळा सोडल्यानंतर होते.शाळेत असताना अनेक चांगले शिक्षक मिळाले हे भाग्यच असं आता लक्षात येतं. अनेक शिक्षक अनेक कारणांनी आवडायचे.हिंदी विषय शिकवणाऱ्या वीरकरबाई आवडायच्या त्यांच्या शिकवण्यामुळे.शिकवता शिकवता जणू आयुष्याचे धडेच त्या द्यायचा. त्यांनी शिकवलेला प्रतिक्रिया ही जीवन की कसौटी है हा धडा तर माझ्या कायमचा लक्षात राहिला आहे.राष्ट्रभाषा सभेच्या वेगवेगळ्या परीक्षेच्या निमित्ताने होणारे तास मला नेहमीच आवडायचे. आम्ही शाळेत असताना एकट्या राहणाऱ्या वीरकरबाई नेहमी त्यांचा आब राखून असायच्या. त्यांच्याबद्दल नेहमी आदर वाटायच्या. शाळेत असताना एक वर्षी बहुधा १९८६ मध्ये त्यांनी मला शाळेच्या हिंदी दिनाच्या कार्यक्रमाचा प्रमुख ( बहुधा अध्यक्ष) केलं होतं.त्यावेळचे माझं सादरीकरण त्यांना आवडलं होतं. त्यांनी आवर्जून कौतुक केलं होतं. नोव्हेंबर २०१९ मध्ये बाईंची भेट झाली. तेव्हा त्या साताऱ्यात बहिणीकडे राहत होत्या. त्यांचे स्मरण चांगले होते.व्यक्ती,घटना त्यांना चांगल्या आठवत होत्या .बरोबरीचे अनेक सहकारी क्रमाने काळाच्या पडद्याआड गेल्याचं दुः...