साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग (भाग २)

 न.चिं. बर्वेसर

बर्वेसर नेहमीच आवडायचे त्यांच्याशिकवण्याच्या पद्धतीमु ळे. त्यांचं शिकवणं मला फार आवडायचं. आम्हाला त्यांनी इंग्लिश, संस्कृत, इतिहास,भूगोल हे विषय शिकवले. आम्ही नववीत असताना शुक्रवारी त्यांचे या विषयाचे सलग चार तास होते.पण कधी कंटाळा आल्याचे आठवत नाही. एकदा तर ते गंमतीने म्हणाले की " शुक्रवारी मी शाळेत कपड्यांचे दोनतीन जोड आणले पाहिजेत.मधल्या वेळात कपडे बदलून आलो तर तेवढंच तुम्हाला काही वेगळं वाटेल." ते दरवर्षी दहावीचे मोजकेच ५ विद्यार्थी खाजगी शिकवणीसाठी घ्यायचे.आम्ही पाचजण त्यांच्याकडे नियमित जायचो.त्यांच्या शिकवणीमुळे इंग्लिश भाषेची गोडी लागली. ते be या क्रियापदाला त्याची आठ रूपे होतात म्हणून "अष्टपुत्रे" म्हणत असत. महासगरांना जोडणाऱ्या कॅनॉलबद्दल 'अ पॅ पनामा तांब्या भू सुएझ " असं लक्षात ठेवायचं हे त्यांनी सांगितल्याचं अजूनही आठवतं.
एक इच्छा मात्र अर्धवट राहिली.शाळेच्या स्नेहसंमेलनात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात काम करण्याची इच्छा अपूर्ण राहिली.आम्ही बहुधा नववीत असताना गडकऱ्यांच्या नाटकातील काही प्रवेश त्यांनी बसवायचं ठरवलं होतं.सुरुवातही झाली होती.पण काही कारणांमुळे ते मध्येच बारगळलं.
सरांचं वाचनही चांगलं होतं. शिकवताना ते लक्षात येत असे. एक आणखी गोष्ट म्हणजे ते साखरवाडीत मोजक्या जणांना भेटायचे त्यांच्याशी बोलायचे. त्यांच्या एका वर्तुळाबाहेर ते कधी दिसायचे नाहीत.सरांचे ११ में २०१९ ला निधन झाले. सरांना आदरपूर्वक अभिवादन ...!

फोटो सौ. जाई बर्वे जोशी यांच्याकडून




66 Com

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख