काहीतरी केल्याचे समाधान
काही दिवसांपूर्वी दुचाकीवरून चाललो होतो. एका चौकात सिग्नल लाल झाला म्हणून थांबलो. नेहमीप्रमाणे गाडी बंद केली. वाटले, तेवढेच थोडे प्रदूषण कमी झाले. आजूबाजूला लक्ष गेले आणि पाहिले तेव्हा आजूबाजूच्या सर्व दुचाकी गाड्या सुरूच होत्या. तशाच चारचाकी गाड्यादेखील सुरू होत्या. मनात विचार आला , आपल्या गाडी बंद करण्यामुळे प्रदूषणात किती घट होईल बरे ? पुणे शहराचा विचार केला तर शहरात चारचाकी आणि दोनचाकी गाड्या यांच्या संख्येत फार मोठा फरक नाही. आजकाल सर्व चारचाकी गाड्या एसी असतात आणि तो एसी सर्व वेळ चालू असतो. त्यामुळे सिग्नलला चार चाकी गाडी बंद करता येत नाही. दोन चाकी गाड्या चालवणारे बरेच जण गाडी तशीच सुरू ठेवतात. त्यामुळे वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये एखाद दुसऱ्या व्यक्तीने जर सिग्नलला गाडी बंद केली तर फार फरक पडणार नाही. प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रदूषणात भर घालणारा असाच एक मोठा घटक म्हणजे औद्योगीकरण. कारखान्यांमधून बाहेर पडणारे धूर, वायू हे किती प्रदूषण करतात हे अनेक ठिकाणी पाहता येते. याबाबत सरकारी...