अशाच काही आठवणी
आयुष्य जगत असताना अनेक प्रसंग घडतात. घडामोडी होतात. गोष्टी घडतात किंवा बिघडतात. त्या त्या प्रसंगाप्रमाणे त्या आठवणी मनावरती कोरल्या जातात. या आठवणींचा काळ हा कमी अधिक असतो. आठवणीच्या प्रसंगाच्या तीव्रतेप्रमाणे या आठवणी थोडा किंवा जास्त वेळ लक्षात राहतात. कमी तीव्रतेच्या प्रसंगांच्या आठवणी काही दिवसानंतर विस्मरणात जातात. म्हटले तर तो प्रसंग किंवा ती घटना तशी फारशी महत्त्वाची नसते. परंतु अशा आठवणींपैकी काही आठवणी प्रसंगानिमित्त पुन्हा वर येतात. एका अर्थाने ते काही क्षण अनुभवण्याची पुन्हा संधी देतात. या लेखाच्या निमित्ताने माझ्या अशाच काही आठवणी या प्रामुख्याने छत्रपती संभाजी नगर येथील १९९७ ते १९९९ या काळातील आहेत. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणजे प्रचारक म्हणून मी तिथे काम करत होतो. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्ते श्री. कुलभूषण बाळशेटे यांच्याशी काही निमित्ताने फोनवर बोलणे झाले त्यांना सर्व कार्यकर्ते दादा बाळशेटे म्हणून ओळखतात. फोनवर बोलताना मी त्यांना विचारले, " दादा, तुमच्या घरी अजून जिंदा तिलिस्मात नावाचे...