Posts

Showing posts from February, 2023

गुंतागुंतीचे आयुष्य

Image
      काही दिवसांपूर्वी एका बैठकीत एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणाले, " बांधकामासाठी साहित्य पुरवणाऱ्यांचा एके ठिकाणी संप चालू आहे. त्यामुळे अपेक्षित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करता येणार नाही. म्हणून जादा दिवस गृहित धरले आहेत." हे ऐकल्यावर मनात विचार आला की आयुष्य किती गुंतागुंतीचे झाले आहे. कुठेतरी एखादी घटना घडते आणि त्याचे दूरवर परिणाम होतात.            ( बांधकाम चालू असतानाचे प्रातिनिधिक छायाचित्र  )        भारतात हजारो वर्षे जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात राहत आलेली आहे. पूर्वी ही गावे बऱ्यापैकी स्वयंपूर्ण होती. गरजेच्या बहुतेक सर्व गोष्टी गावातच तयार व्हायच्या. मर्यादित प्रमाणात बाहेरून गोष्टी आणाव्या लागायच्या. त्यामुळे बाह्य गोष्टी, घडामोडी यांचा थोडा परिणाम ग्रामजीवनावर व्हायचा. तसेच लोकांच्या एकूण गरजाही मर्यादित होत्या. त्यामुळे आयुष्य हे बऱ्यापैकी सरळसोट होते.        पण औद्योगिक क्रांतीनंतर जगातील एकूणच परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. यंत्रांवर आधारित मोठे मोठे कारखाने सुरू झाले. घाऊक प...