Posts

Showing posts from March, 2023

सामाजिक कार्यकर्त्यांसाठीचा आदर्श दीपस्तंभ

Image
       भारत वर्षाच्या अवनीतीची कारणमीमांसा करून त्यावर उपाय योजना करणारे पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे विलक्षण व्यक्तिमत्व होते. त्यांचे सर्व जीवनच हा सामाजिक कार्य करू इच्छिणाऱ्यांसाठी वस्तूपाठच आहे. या आदर्श जीवनाचे त्यांच्या जयंतीनिमित्त केलेले हे चिंतन. सामाजिक कार्यकर्त्यांची ध्येयनिष्ठा ही अभंग असावी लागते. कोणत्याही कारणाने यामध्ये तडजोड होणे अथवा करणे योग्य नाही. पूजनीय डॉ. हेडगेवारांच्या जीवनातून ही गोष्ट आपल्या लक्षात येते. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केल्यापासून त्यांनी आपल्या जीवनात इतर कोणत्याही गोष्टींना प्राधान्य दिले नाही. १९३९ डॉक्टर विश्रांती व उपचाराकरिता बिहार मधील राजगीर या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांच्या अनुमतीशिवाय आणि अनुपस्थितीत हिंदू महासभेच्या वतीने उभारल्या जाणाऱ्या रामसेनेचे प्रमुख म्हणून त्यांचे नाव डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी घोषित केले. डॉ.मुंजे हे वडीलधारे व्यक्तिमत्त्व. त्यांनी अनेक वेळा डॉक्टर हेडगेवार यांची पाठराखण केली होती. परंतु अशा पितृतुल्य व्यक्तिमत्वाने परस्पर नाव घोषित करावे आणि संघ कार्य हे जीवित ...