हुतात्मा हेमू कालाणी
ही गोष्ट आहे देशासाठी मरण पत्करणाऱ्या एका युवकाची! आता पाकिस्तानात असणाऱ्या सिंध प्रांतामध्ये सक्कर नावाचे एक गाव आहे. त्या गावात एक छोटा मुलगा तिरंगा झेंडा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत गावभर फिरत होता. 'राष्ट्रीय झेंडा फडकतो आहे. शत्रू भयाने थरथर कापत आहे.'अशा अर्थाचे ते गीत होते. एके दिवशी हा मुलगा आपल्या घरी गळ्याभोवती फास लावून बघत होता. तेवढ्यात त्याच्या आईचे तिकडे लक्ष गेले आणि तिने विचारले, " बाळा हे काय करतो आहेस?" त्यावेळी हसतच तो मुलगा म्हणाला , " आई मी काही एवढ्यात मरणार नाही. परंतु हुतात्मा भगतसिंग जेव्हा हसत हसत हसावर गेले त्यावेळी त्यांना काय वाटले असेल हे समजून घेण्यासाठी मी हे करतो आहे." आईला जरा हायसे वाटले. पण तेवढ्यात तो मुलगा पुढे म्हणाला, " आई पण एके दिवशी मलादेखील भगतसिंगांसारखे देशासाठी मरण पत्करायचे आहे". बाळाचे हे बोलणे ऐकून आईच्या हृदयात धस्स झाले. कोण होता हा मुलगा? ( चित्रकार श्री.निलेश जाधव सौजन्य मन:शक्ती बालकुमार ) 'सिंध प्रांताचे भगतसिंग' म्हणून ओळखले गेलेले हे होते हुतात्मा हेमू कालाणी. भगतसिंग हे अग...