स्वतःचे मरण ठरवणारा महापुरुष

नुकताच एका प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांच्या भाषणाचा व्हिडिओ ऐकला त्यात ते म्हणाले की लाखांमध्ये एखाद्याला शांतपणे मरण येते. त्यावेळी मनात विचार आला की असे मरण कोणाला बरे आले होते बरे? ते अचानकपणे आले की ठरवून आले? विचार करायला लागल्यानंतर लक्षात आले की स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण याबाबत देता येईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामीजींनी ठरवून मरण स्वीकारले. याबाबत त्यांचे गुरुबंधू , शिष्य यांनी आठवणी लिहून ठेवल्या आहेत त्यावरून ही गोष्ट सिद्ध होते. ( छायाचित्र सौजन्य https://vedantaprov.org/swami-vivekananda/ ) स्वामीजींच्या एक पाश्चात्य शिष्या होत्या. त्यांचे नाव जोसेफाईन मॅकलाऊड. स्वामीजींच्या मृत्यूच्या आधी काही महिने त्या म्हणाल्या , " स्वामीजी मी आपल्याला दर महिन्याच्या खर्चासाठी ५० डॉलर्स देईन. आता मी तुम्हाला एकदम चार महिन्यांसाठी दोनशे डॉलर्स देते. " स्वामीजी म्हणाले की , "एवढे सगळे खर्च होण्याची वेळ येणार नाही." आणि तसेच झाले तीनच महिन्यांनी स्वामीजींचे निधन झाले. स्वामीजी अनेक वेळा म्हणत असत, " मी चाळीशी पूर्...