छ. शिवराय : अखिल भारतीय दृष्टी
भारताचा मध्ययुगीन इतिहास लिहिताना तुर्क, पठाण, मोगल, इंग्रज, फ्रेंच इत्यादी लुटारू आक्रमकांच्या दृष्टीने लिहिला गेल्याचे आढळते. त्यामुळे ही तत्कालीन आक्रमक मंडळी छ. शिवाजी महाराजांना बंडखोर, लुटारू अशी विशेषणे वापरत असत. जणू काही ते स्वतःच इथले मालक आहेत असा हा आविर्भाव. चोराच्या उलट्या बोंबा त्या ह्याच! छत्रपती शिवरायांचा लढा हा भूमिपुत्रांचा लढा असून तो स्वातंत्र्यलढा आहे ही भूमिका त्यांनी कधीच मान्य केलेली दिसत नाही. तसेच महाराजांचे विचार, दृष्टी महाराष्ट्रपुरती किंबहुना त्यांच्या ताब्यात असलेल्या महाराष्ट्राच्या, तामिळनाडूच्या आणि कर्नाटकाच्या काही भूमिपुरती मर्यादित होती अशीदेखील समजूत दिसते. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार) परंतु महाराजांची दृष्टी ही केवळ आपल्या ताब्यातील भूप्रदेशाएवढीच मर्यादित नव्हती तर ती अखिल भारतीय होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे. याचे अनेक पुरावे देता येतील. ॲबे बार्तुलमी कॅरे नावाचा एक युरोपियन प्रवासी शिवाजी महाराजांच्या जीवित काळात दोन वेळा भारतात प्रवास करण्यासाठी आला होता. त्याने आपल्या आ...