मन झाले नितळ
( काल्पनिक कथा ) ( मन झाले मोकळे या कथेचा पुढचा भाग. आधीची कथा कॉमेंटमधील दुव्यावर ) उद्यानातून परतल्यावर राजे विक्रमगुप्त निश्चयपूर्वक कामाला लागले. आपल्याकडे दिवस अतिशय थोडे राहिले आहेत याची त्यांना जाणीव झाली होती. म्हणून कोणत्या क्रमाने गोष्टी करायच्या याचा विचार त्यांनी उद्यानात असतानाच करून ठेवला होता. परंतु या सर्व गोष्टी करत असताना अतिशय काळजीपूर्वक त्या कराव्या लागणार होत्या कारण त्यांच्या बोलण्यातून अथवा कृतीतून येणाऱ्या प्रसंगाची कोणालाही कल्पना येऊ द्यायची नव्हती. ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ) उद्यानातून परतलेले राजे विक्रमगुप्त जवळपास आधीसारखेच वागत आहेत हे राणी शीलवती यांच्या लक्षात आले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. गेले आठवडाभर त्यांच्याही जीवात जीव नव्हता. राजेसाहेबांच्या अस्वस्थतेमुळे त्यादेखील बेचैन झाल्या होत्या. मनात नाही नाही त्या शंका उपस्थित झाल्या होत्या. सगळ्यात मोठे दुःख राजेसाहेब ...