छ. शिवराय : सागरी दुर्ग आणि सलगी देणे
छ. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अनेक पैलू आहेत. या द्रष्ट्या महापुरुषाने परिस्थितीचा सर्वांगीण विचार केला आणि भविष्याचा वेध घेऊन भूतकाळातील चुका, त्रुटी दुरुस्त करण्यासाठी परिश्रम केले. शिवरायांच्या पूर्वी ३०० वर्षे महाराष्ट्रात धर्मांध आक्रमकांची सत्ता होती. या धर्मांध आक्रमकांनी भूमीवर जम बसवला पण सागरी सत्तेकडे मात्र दुर्लक्ष केले. भारताचा विचार केला तर मध्ययुगीन काळात क्रूर मोगली सत्तेचे वर्चस्व भारताच्या मोठ्या भूभागावर राहिले. परंतु त्यांनीदेखील सागरी सत्ता उभारण्याचा प्रयत्न केला नाही. इतके दुर्लक्ष केले की मोगली बादशाहाला देखील मक्केला जाण्यासाठी युरोपियनांचा परवाना लागे. महाराजांची दूरदृष्टी अशी की त्यांनी सागरी सत्ता उभारण्याची कल्पना मनामध्ये घेऊन त्याप्रमाणे पावले उचलली. ( सिंधुदुर्गावरील शिवराजेश्वर मंदिरातील छ. शिवराय ) ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) सागरी सत्तेचा एक ...