Posts

Showing posts with the label राजा मंगळवेढेकर

चहाच्या निमित्ताने....

Image
       गरम चहाचा कप पाहून मला अनेक वेळा कै. सुनीलराव खेडकर यांची आठवण येते. दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्याबरोबर मी आधी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि नंतर संघाच्या पुणे महानगर कार्यकारिणीत काही वर्षे काम केले. ते म्हणत असत की, "मला अगदी उकळत असलेला चहा ताबडतोब आणून द्या अगदी कढत चहा हवा." एवढा कढत चहा पिणारे ते मी पाहिलेले एकमेव व्यक्ती. याउलट काही जणांना चहा थंड झाल्यावर पिण्याची सवय असते. चहा थंड होऊ लागला की त्याच्यावर साय धरते. मला ती आवडत नाही. म्हणून अनेकवेळा मीटिंगमध्ये चहा आणून दिला की सांगून मी गरम चहा घेत असतो.       चहाचा विषय निघाला की हमखास वाक्य आठवते ते म्हणजे "चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो." पूर्वी फक्त चीनमध्ये आढळणारा चहा ब्रिटिश कंपन्यांनी भारतात पद्धतशीरपणे रुजवला.  आता भारतात चहाचा खप प्रचंड होतो. भारतीयांनी चहाची स्वतःची पद्धत शोधून काढली. चहाच्या निमित्ताने नेहमी आठवते ती इतिहासाच्या पुस्तकात शिकलेली बोस्टन टी पार्टी इंग्रजांच्या दडपणाला जुगारून देऊन अमेरिकेत स्थिरावलेल्या लोकांनी ब...