अधिक महिन्याची माहिती
शाळेत असताना वेगवेगळ्या म्हणी शिकायला मिळाल्या. त्यातील काहींचे संदर्भ त्यावेळी समजले नाहीत. असो म्हणींपैकीच एक म्हणजे "दुष्काळात तेरावा महिना" ही म्हण. त्यावेळी वाटायचं की जानेवारी ते डिसेंबर असे बाराच महिने दरवर्षी असतात तर या म्हणीत तेरावा महिना कुठून आला. पुढे पारंपरिक भारतीय कालगणना समजल्यानंतर या म्हणीचा अर्थ लक्षात आला. पारंपारिक भारतीय कालगणना ही चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून आहे. त्यामुळे चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यामध्ये दरवर्षी साधारण साडे दहा दिवसाचे अंतर पडते. त्यामुळे दर तीन वर्षांनी भारतीय कालगणनेत हा अधिक मास वाढवण्यात आला आहे आणि त्याची सांगड सौरवर्षा बरोबर करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय सणवार, उत्सव यांच्यावेळी दरवर्षी त्याच पद्धतीचे हवामान, वातावरण अनुभवायला मिळते.
हिजरी कालगणनादेखील चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून आहे. पण त्या कालगणनेत अशा पद्धतीची जोड नसल्यामुळे मुस्लिम सण हे निरनिराळ्या वर्षात वेगवेगळ्या महिन्यात आलेले अनुभवायला मिळतात.
पण या पारंपारिक कालगणनेची माहिती पुढील पिढीला आहे का? मध्यंतरी घरातील एका लग्न समारंभात पुतणे, पुतण्या, भाचे, भाच्या यांना याबाबत विचारले तर त्यांना सांगता आले नाही त्यामुळे त्यांना समजावून सांगितले.
आपले हे संचित आपण आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवायला हवे.
सुधीर गाडे, पुणे
Very nice sir. Truly many of us just say it and leave
ReplyDeleteखूपच छान माहिती, आज मला पण हे नव्यानेच समजले , धन्यवाद
ReplyDeleteअप्रतिम 🙏
ReplyDeleteधन्यवाद शिक्षक
ReplyDelete