साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग ( भाग ९)
प्र.नि.बोंद्रेसर
उंचपुरे बोंद्रेसर जवळच्या मुरूमवरून मोटरसायकलवरून यायचे.इतर बहुतेक शिक्षक त्यांच्या वसाहतीत राहायचे.आमच्या वर्गाला बोंद्रेसर दहावीला असताना भूमिती शिकवायचे.विशेष गोष्ट म्हणजे कोणतंही साधन न वापरता ते व्यवस्थित वर्तुळ काढायचे.त्यांच्या शिकवण्यामुळे भूमितीमधील प्रमेये आणि त्यांच्या सिद्धता चांगल्या समजल्या.
आणखी एक बाब म्हणजे त्यांचा दरारा.ते वर्गात शिकवत असताना वर्गात सर्वजण एकदम शांत असायचे.
काही वर्षांपूर्वी माझ्या एका लेखावर प्रतिक्रिया पहिली आणि सुखद धक्का बसला.
सरांना विनम्रपणे नमस्कार..
(फोटो सरांच्या फेसबुक प्रोफाइलवरून)
Comments
Post a Comment