महात्मा ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेतील कार्य

 महात्मा ज्योतिबा फुले यांनी


१८७६-८२ मध्ये पुणे नगरपालिकेचे सभासद म्हणून काम केले.
• कार्यकारी मंडळ सर्वसाधारण सभेला जबाबदार असावे असा आग्रह त्यांनी धरला.
• त्यांनी लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले.
• भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रयत्न केला.
• १८ जुलै १८८० ला दारूचे गुत्ते वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.त्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. ते म्हणाले,' दारुचे व्यसन नैतिक आचरणास बाधक आणि आरोग्यास अपायकारक आहे.' ( १८७४ ते १८७९ या वर्षात दारूचा खप ५० टक्क्यांनी वाढला होता. इंग्रजी अधिकाऱ्यांच्या मते गावठी दारूचे दुष्परिणाम जास्त होत. त्यासाठी दारूची मान्यताप्राप्त दुकाने जास्त उघडली पाहिजेत.)
• ३० नोव्हेंबर १८८० महाराज्यपाल ( व्हॉइसरॉय ) लिटन याच्या पुणे भेटीच्या वेळेला सुशोभीकरणासाठी १००० रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आला होता. त्यांचा एकट्याचा(३२ जणांपैकी ) या प्रस्तावास विरोध होता.
( संदर्भ धनंजय कीर लिखित चरित्र)
महापुरूषाला विनम्र अभिवादन..!

( छायाचित्र विकिपीडिया)
सुधीर गाडे, पुणे

8 Comments

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख