प्रवीण विठ्ठल तरडे यांची भेट

 १७/७/१५ रोजी प्रवीण विठ्ठल तरडे यांची भेट झाली. आपण त्यांना ओळखतो ते लेखक,दिग्दर्शक म्हणून. पण या भेटीत त्यांची काही वेगळी ओळख समजली.

विद्यार्थीदशेपासून ते व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करतात.२००० मध्ये गरवारे कॉलेजमध्ये २०० तरूणांना व्यसनमुक्तीची शपथ देण्याचा कार्यक्रम त्यांनी घेतला होता.जिथे व्यसन ही नेहमीचीच गोष्ट आहे अशा चित्रपटसृष्टीत काम करत असताना अनेकांना त्यांनी व्यसनांपासून त्यांनी परावृत्त केले आहे. ३१ जुलैपासून त्यांचा "देऊळ बंद" चित्रपट प्रदर्शित होतो आहे.त्याच्या चित्रीकरणासाठी त्यांनी आग्रहपूर्वक निर्व्यसनी लोकांची निवड केली.त्यांच्या या प्रयत्नांबद्दल मनापासून अभिनंदन! यापद्धतीचे प्रयत्न आपणही आपापल्या पातळीवर करूया.
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची " एक वाचक बाकी सूचक" ही संस्था. वाचनसंस्कृती वाढवण्याचा उपक्रम अनेक मान्यवर कलाकारांना बरोबर घेऊन ते करतात. त्यांच्या या उपक्रमामधील लोकांमध्ये त्यांच्याबरोबरच आणखी बारा जणांनी स्वतःचा ५००० पुस्तकांचा संग्रह केला आहे. त्यांच्याकडे कामासाठी येण्याकरता किमान १०० पुस्तकांचे वाचन हवे अशी अट त्यांनी घातली आहे. त्यांच्या वाचनप्रेमी व वाचन वाढावे यासाठी प्रयत्न करण्याच्या वृत्तीला प्रणाम.!

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख