विकृतीला वेसण
समाजातील काही व्यक्ती विकृत वर्तन करतात. त्यापैकीच एका अनुभवाचं हे कथन.
आमच्या म.ए.सो. महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहाच्या मुलींच्या इमारतीमागे पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय आहे. तिथून मागच्या बाजूने मुलींच्या वसतिगृहाची इमारत दिसते. साधारण ६-७ वर्षांपूर्वी वसतिगृहाच्या मुलींनी या क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात रात्रीच्या वेळी उभे राहून एक माणूस मुलींच्या वसतिगृहाकडे तोंड करून , मुलींना दिसेल अशा पद्धतीने मुद्दाम विकृत लैंगिक चाळे करतो असे वसतिगृहात काम करणाऱ्या मावशी सौ. शोभा डोईजोडे यांना सांगितला. शोभामावशींनी माझी पत्नी सौ.शैलजा हिला सांगितले. एका मुलीने त्याचा फोटोदेखील मोबाईलमध्ये काढून घेतला होता.सौ.शैलजाने हा प्रकार मला आणि मी त्यावेळचे वसतिगृहप्रमुख डॉ. एन. एस. उमराणी यांना सांगितला. काय करायचे याची आम्ही चर्चा केली. यासाठी पोलीस मदत क्रमांक १०० ची मदत घ्यायचे आम्ही ठरवले.
एके दिवशी रात्री सौ.शैलजा मुलींच्याबरोबर त्या बाजूच्या बाल्कनीत जाऊन बसली. नेहमीप्रमाणे तो माणूस येऊन विकृत चाळे करू लागला. त्यावेळी शैलजाने शंभर क्रमांकाला फोन करायला मला सांगितले. माझ्या मोबाईलवरून फोन काही अडचणीमुळे लागत नाही हे लक्षात आल्यावर तिने स्वतःच्या मोबाईलवरून शंभर क्रमांकाला फोन केला. अगदी काही मिनिटातच पोलीस वसतिगृहापाशी आले. त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांच्याबरोबर मी आणि शैलजा क्षेत्रीय कार्यालयात पोचलो पण तोपर्यंत तो माणूस तिथून निघून गेला होता. एवढ्या वेळा हा माणूस फार दूर जाऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन पोलिसांनी जवळच्या कॅफे पॅरेडाइजमध्ये जाऊन शोध घेऊया असे सुचवले. आम्ही तिथे गेलो तिथेच तो माणूस बसल्याचे शैलजाने पोलिसांना सांगितले. साधारण तिशीतील हा माणूस होता. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले आणि डेक्कन पोलिस स्टेशनला या असे मला सांगितले.
लगेचच डॉ. उमराणीसर आणि मी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलो. तिथे असलेले पोलीस अधिकाऱ्याने यांनी चौकशी करायला सुरुवात केली. मी विवाहित आहे, मला मुलेबाळे आहेत असे सांगत सुरूवातीला त्या माणसाने असे काही करत असल्याचे नाकारले. पण विकृत चाळे करतानाचा वसतिगृहातील मुलीने काढलेला फोटो दाखवल्यानंतर त्याचे अवसान गळाले. त्याला पोलिसांनी त्याला त्यांचा खाक्या दाखवला. त्याच्या भावाला बोलावून घेतले. त्याच्या भावाला या सगळ्या प्रकाराची कल्पना दिल्यावर लाजेने तो भाऊ रडू लागला. पोलिसांनी दाखवलेल्या खाक्यामुळे त्या माणसाने पुन्हा असे करणार नाही असे कबूल केले. त्यानंतर पुन्हा त्या माणसाने असे विकृत वर्तन केले नाही. त्याच्या विकृतीला आम्ही वेसण घालू शकलो.
सुधीर गाडे, पुणे
Hilarious incident and nicely handled....
ReplyDeleteआमच्यासाठी हा एक अनुभवाचा धडा होता.
Deleteपरिस्थितीचे गांभीर्य आणि ती हाताळणे या दोन्ही गोष्टी आपण अत्यंत छान रितीने
ReplyDeleteधन्यवाद
Deleteपरिस्थिती हाताळणे वाटते तेवढे खरोखरीच सोपे नसते
ReplyDeleteखूप छान
होय
Delete