भारताच्या विभाजनाचा इतिहास



२०फेब्रुवारी १९४७ ते १७ ऑगस्ट १९४७(होय होय १७ ऑगस्ट १९४७च) ह्या छोट्याश्या काळात ज्या वेगाने घटना घडल्या त्याने एक दुःखदायक, रक्तरंजित,वेदनादायक असा इतिहास लिहिला गेला.या कालावधीत कोट्यवधी लोक निर्वासित झाले, लाखो निरपराध प्राणाला मुकले तर हजारो महिलांच्यावर अमानुष अत्याचार झाले.
या काळातील ठळक घडामोडी
२० फेब्रुवारी १९४७ :-"आम्ही जून १९४८ (होय जून १९४८च) पर्यंत भारतात सत्तांतर करू." क्लेमेंट ॲटली सरकारची ब्रिटीश पार्लमेंटमध्ये घोषणा,३ जून १९४७ :- भारताच्या फाळणीची व्हॉईसरॉय माउंटबॅटनची घोषणा,१४ ऑगस्ट १९४७:- पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन, १५ ऑगस्ट १९४७ :- भारताचा स्वातंत्र्यदिन , १७ ऑगस्ट १९४७ :- भारत,पाकिस्तानच्या सीमा ठरवण्यासाठी नेमलेल्या रॅडक्लिफ आयोगाने सीमा जाहीर केल्या.
विचार करायला लावणाऱ्या गोष्टी:-
जून १९४८ ची मुदत असताना हे स्वातंत्र्य ऑगस्ट १९४७ मध्ये आणि १५ ऑगस्टलाच का तर जपानी सैन्याने१५ ऑगस्ट १९४५ ला युद्धात  माउंटबॅटनपुढे शरणागती पत्करली होती. 
पाकिस्तान कदापी निर्माण होणार नाही असे म्हणणाऱ्या नेत्यांचे शब्द खोटे का ठरले? 
सीमा आयोगाचा निर्णय देखील १५ ऑगस्ट पर्यंत येणार नाही हे कळूनसुध्दा १५ ऑगस्टच्या हट्टाला विरोध का झाला नाही?
अतिप्रचंड अशा देशाच्या सत्तेचे व्यावहारिक हस्तांतरण केवळ अडीच महिन्यांच्या काळात होणे अशक्यप्राय असतानादेखील १५ ऑगस्टचाच हट्ट मान्य का केला गेला?
१९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने पहिल्यांदाच संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव केला आणि २६ जानेवारी १९३० हा स्वातंत्र्यदिन घोषित केला मग २६ जानेवारी १९४८ चा आग्रह शेवटपर्यंत का धरला गेला नाही?
सीमाभागातील भारतीयांवर ओढवलेल्या दुर्दैवी,भीषण संकटांची जाणीव इतर भागातील भारतीयांना झाली का?
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या या भारतभूमीत जन्मलेले, समान पूर्वजांचे वंशज असणारे लोक एकमेकांना शत्रू का मानू लागले? या प्राचीन भूमीचा वारसा का नाकारू लागले? या भूमीतील तत्वज्ञान त्यांना परके का वाटू लागले?
एक ध्येयस्वप्न :- जगाच्या वाटचालीत निर्णायक भूमिका बजावू शकणारा भारत सामर्थ्यसंपन्न आणि स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने या आणि अशा अनेक प्रश्नांचा डोळस अभ्यास आवश्यक आहे.या अभ्यासातून योग्य ते धडे घेऊन आपण सर्व परिश्रम करत राहिलो तर हे वैभवशाली अखंड भारताचे ध्येयस्वप्न लवकरच साकार होईल.

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख