गडहिंग्लज : काही संस्मरणीय क्षण

 दि.३ जानेवारी २०१६ रोजी होणाऱ्या " शिवशक्तीसंगम" या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्मासाठी १४-१७ नोव्हेंबर गडहिंग्लजमध्ये ( कोल्हापूर) विस्तारक होतो.




 समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांची भेट झाली. संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची भूमिका दिसली.
        या विस्तारक काळातील अनुभव संघकामाची प्रेरणा आणखी बळकट करणारा होता.
       काही संस्मरणीय क्षण -
* एका घरी सकाळीसकाळी गेलो तेव्हा काकूंनी येऊन पटकन औक्षण केले.
* शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याच्या घरी कै.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाला जाणे झाले.
* देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी आयुष्यभर काम करणारे श्री. विठ्ठलराव बन्ने यांच्या घरी त्यांच्या मुलाशी भेट व चर्चा झाली. 
* नाईक समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते श्री.शिवाजी नाईक यांची भेट झाली.संघकाम हे सर्व भेदांच्या पलिकडे जाणारे आहे व ते अजून वाढले पाहिजे असे ते तळमळीने सांगत होते.
* शिक्षणतज्ञ जे.पी.नाईक यांचे नातेवाईक प्रा.श्रीकांत नाईक यांची भेट झाली.ते दरवर्षी उत्तुर गावात १-७ जानेवारी या काळात व्याख्यानमाला चालवतात. गेली अनेक वर्षे ही व्याख्यानमाला चालू आहे.
* माध्यमिक शाळेत शिक्षक असणारे श्री.सुरेंद्र बांदेकर यांची भेट झाली. ते दर आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी क्रमशः पुस्तकवाचन करतात.सध्या प्रकाशवाटा या पुस्तकाचे वाचन चालू आहे.हा उपक्रम त्यांच्या नियमित तासांच्या व्यतिरिक्त चालू आहे.
         पाडुनिया तट भेदांचे हिंदुत्व गर्जूनी उठले
         सामाजिक पुरूषार्थाचे युग संघाचे अवतरले     
                                      सुधीर गाडे

Comments

  1. खरंच शिव शक्ती संगम एक अवर्णनीय अनुभव होता. लोट्यातून जवळपास 40 जणांची टीम दक्षिण कोल्हापूर कक्षाच्या व्यवस्थेसाठी आली होती. म ए सो मुळे कोकण प्रांतात असूनही या अपूर्व सोहळ्याला सहभागी होण्याची संधी मिळाली.. माननीय संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांचे शब्द आजही आठवतात .."व्यवस्था कोलमडली ती कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असे समजावे !"आमच्यापैकी अनेकांसाठी अशा पद्धतीच्या संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती .या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघ शिस्त आणि नियोजनाचा एक वस्तुपाठ पुणे महानगराने घालून दिला. खऱ्या अर्थाने एक शिवधनुष्य उचलण्याचे धाडस स्थानिक कार्यकर्ते यांनी केले आणि ते यशस्वीपणे केले. नटवू नीज कर्तुत्वाने सारखे अवस्मरणीय वैयक्तिक गीत... पूजनीय मोहन जी ना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी अशा अनेक आठवणी आहेत. मा.चंद्रकांत दादांनी कक्षाला दिलेली भेट.. व्यवस्थेच्या कार्यकर्त्यांशी केलेला सहज संवाद अनेकांना आजही आठवतो. 2018 मध्ये कोंकण प्रांत हिंदू चेतना संगम झाले पण तालुकास्तरावर रचना असल्यामुळे ती भव्यता अनुभवता नाही आली नाही. परंतु हिंदू चेतना संगम च्या निमित्ताने खेड तालुक्यातील प्रत्येक मंडला पर्यंत पोहोचण्यासाठी करावयाची योजना ,प्रवास, गणवेशाची उपलब्धता इत्यादी गोष्टींचा आनंद घेता आला.पुढे कोकण प्रांतात अनेक संघ परिचय वर्गामध्ये शिवशक्ती संगम चे सादरीकरण झाले ..!

    ReplyDelete
  2. शिवशक्ती संगम च्या साठी नोंदणी करण्यासाठी सहभागी होण्यासाठी केलेल्या आव्हानाला एका अध्यापकाने "आम्ही वेगळ्या विचाराचे आहोत .मग आम्ही नोंदणी नाही केली तरी चालेल का " अशी विचारणा देखील केली होती. स्वाभाविक सदर अध्यापकाने नोंदणी केली नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख