भारताचे ध्येय
Up, India, and conquer the world with your spirituality!
-Swami Vivekananda
Lectures from Colombo to Almora
स्वामी विवेकानंद यांनी भारतापुढे आपल्या ध्येयाची स्पष्ट कल्पना मांडली आहे. आध्यात्मिकतेच्या आधारावर सर्व जगावर विजय हेच ते ध्येय. कैक हजार वर्षांपासून आपल्या देशामध्ये आध्यात्मिकतेचा प्रवाह अखंडपणे वाहत आलेला आहे. अध्यात्मिक कथेचे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग असे विविध मार्ग आपल्या देशामध्ये सांगितले गेले आहेत. यापैकी कोणत्याही मार्गाने गेल्यास अंतिम सत्याची, ईश्वराची प्राप्ती होते हे नि:संदिग्धपणे वारंवार सांगितले गेले आहे. या मार्गांपैकी ती भक्तिमार्गाची अखंडित परंपरा आहे. अनन्यभावाने ईश्वराला शरण जाऊन त्याची भक्ती करण्यासाठी नवविधा भक्ती सांगितली गेली. भक्त लक्षणे सांगताना संत तुकाराम म्हणतात
भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवारुनी ॥१॥
विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे जन धन माता पिता ॥धृ॥
निर्वाणी गोविंद असे मागेपुढे । काहीच साकडे पडो नेदी ॥२॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे । घातलिया भय नरका जाणे ॥३॥
महाराष्ट्रामध्ये विविध संप्रदायांच्या भक्ती परंपरा आहेत. संत ज्ञानेश्वर पासून ते संत तुकाराम यांच्यापर्यंत वारकरी परंपरा आहे. तर दत्तसंप्रदायतील जनार्दनस्वामी वेडा नागेश हे भक्त,
नागेशसंप्रदायातील नागेश अज्ञानसिद्ध हे भक्त,
लिंगायतांमधील मन्मथ स्वामी शांतलिंगस्वामी , सिद्धरामेश्वर हे भक्त विख्यात आहेत. श्रीरामाचे भक्त असणारे संत रामदासदेखील सर्वांना माहिती आहेत. महाराष्ट्राबाहेरचे संत तुलसीदास, संत कनकदास अशी अनेक नावे आपल्याला सांगता येतील. यापैकी संत कनकदास यांना मंदिराच्या मूर्तीसमोर भजनाची मनाई केली तर ते मागच्या बाजूला जाऊन भजन करू लागल्यानंतर मंदिरातील मूर्ती फिरल्याची आख्यायिका सांगितली जाते.
परंतु २०१४ नंतर ज्यांना अध्यात्मिक परंपरा नाकारायची आहे त्यांनी चुकीच्या विचाराने राजकीय नेत्याच्या अनुयायांना भक्त म्हणण्याची पद्धत पाडली. चुकीचा विचारांनी ही पद्धत मुद्दाम पाडणाऱ्यांचे सोडून द्या. परंतु आध्यात्मिक परंपरा मान्य असलेले काही लोकदेखील राजकीय नेत्याच्या अनुयायांना भक्त म्हणणे हा आपल्या श्रेष्ठ परंपरेचा अवमान आहे हे लक्षात घेत नाही.
भक्त आपल्या दैवताची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून भक्ती करत असतो. पण सुधारणावादी आहोत ही भूमिका घेऊन मूर्तीपूजेवर टीका करण्याची पद्धत जगात आणि भारतामध्ये पाहायला मिळते. यासंदर्भात स्वामी विवेकानंद यांनी चेन्नई (तेव्हाचे मद्रास ) येथे केलेल्या भाषणात स्पष्ट निवेदन केले आहे.
It has become a trite saying that idolatry is wrong, and every man swallows it at the present time without questioning. I once thought so, and to pay the penalty of that I had to learn my lesson sitting at the feet of a man who realised everything through idols; I allude to Ramakrishna Paramahamsa. If such Ramakrishna Paramahamsas are produced by idol-worship, what will you have — the reformer's creed or any number of idols? I want an answer. Take a thousand idols more if you can produce Ramakrishna Paramahamsas through idol worship, and may God speed you! Produce such noble natures by any means you can. Yet idolatry is condemned! Why? Nobody knows. Because some hundreds of years ago some man of Jewish blood happened to condemn it? That is, he happened to condemn everybody else's idols except his own. If God is represented in any beautiful form or any symbolic form, said the Jew, it is awfully bad; it is sin. But if He is represented in the form of a chest, with two angels sitting on each side, and a cloud hanging over it, it is the holy of holies. If God comes in the form of a dove, it is holy. But if He comes in the form of a cow, it is heathen superstition; condemn it! That is how the world goes. That is why the poet says, "What fools we mortals be!" How difficult it is to look through each other's eyes, and that is the bane of humanity. That is the basis of hatred and jealousy, of quarrel and of fight. Boys, moustached babies, who never went out of Madras, standing up and wanting to dictate laws to three hundred millions of people with thousands of traditions at their back! Are you not ashamed? Stand back from such blasphemy and learn first your lessons! Irreverent boys, simply because you can scrawl a few lines upon paper and get some fool to publish them for you, you think you are the educators of the world, you think you are the public opinion of India! Is it so? This I have to tell to the social reformers of Madras that I have the greatest respect and love for them. I love them for their great hearts and their love for their country, for the poor, for the oppressed. But what I would tell them with a brother's love is that their method is not right; It has been tried a hundred years and failed. Let us try some new method.
मूर्तीपूजेवर टीका करून आपल्या देशामध्ये सुधारणा करण्याची पद्धत शंभर वर्षे वापरून अयशस्वी ठरली आहे असे स्वामीजी म्हणतात. हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि भक्त या शब्दाचा योग्य अर्थ लक्षात घेऊन त्याचा त्याच पद्धतीने वापर केला पाहिजे आणि जगावर आध्यात्मिकतेच्या आधारावर जगावर संपूर्ण विजय मिळवण्याकडे , प्रभाव पाडण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment