गुरू नानक

 गुरू नानक यांना तरूणपणी त्यांचे मेहुणे दिवाण जयराम यांच्या सांगण्यावरून त्यांच्या गावी सुलतानपूरला नबाब दौलतखान याच्याकडे धान्याच्या गोदामप्रमुखाची नोकरी मिळाली. काम करत असतानाही ते सदैव चिंतन करत असत.एके दिवशी धान्य मोजून देत असताना ते मापाने मोजू लागले "एक , दो, तीन,..........तेरा..." तेरा असा शब्द उच्चारल्यानंतर त्यांना लक्षात आले की या सृष्टीत सर्व काही ईश्वराचेच आहे. या चिंतनात मग्न होऊन ते तेरा, तेरा.... असे म्हणू लागले. धान्य घेणाऱ्याच्या पिशवीत धान्य भरून ओसंडून वाहू लागले. यानंतर त्यांच्याविरुद्ध तक्रार झाली. तक्रारीनंतर केलेल्या मोजणीत धान्य, पैैसे याचा हिशोब बरोबर आढळला. सगळ्यांना प्रश्न पडला की असे कसे झाले. नंंत सर्वांना लक्षात आले की नानकजी स्वतःच्या कमाईइतके दान करत असत. ते पैसै स्वतः भरत असत.

एकदा आपला शिष्य मर्दाना याच्याबरोबर भारतभ्रमण करीत असताना गुरू एका छोट्या खेड्यात गेले.



त्या गावात एका कुष्ठरोग झालेल्या व्यक्तिच्या घरात राहून त्यांनी त्याची रात्रभर सेवा केली. त्याला उपदेश केला. कुष्ठरोगामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या त्या व्यक्तिच्या जीवनात आशेचा प्रकाश पसरला. गुरूंनी स्वतःच्या आचरणातून सेवेचा संदेश दिला.

समाजाला आपल्या वाणीने त्यांनी उपदेश केला आहे. केवळ जन्मामुळे प्राप्त होणाऱ्या जातीचा गर्व नको असे सांगताना त्यांनी उपदेश केला

जाति का गरब न कर मूरख गंवारा ।
सि गरब ते चलई बहुत विकारा ।।
सर्व समाजघटकांमध्ये मिसळणाऱ्या गुरूंचा हा उपदेश आजही अनुकरणीय आहे.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

गुरु नानक यांना विनम्र अभिवादन..!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख