बोल जलमहर्षीचे...

 


मे २०१६ मध्ये ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या स्थापना दिनानिमित्त डॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे भाषण ऐकण्याचा योग आला. तेव्हा ते म्हणाले...

🔸काही शैक्षणिक संस्थांच्या संचालकांकडे "silent arrogance" असतो. ज्ञानप्रबोधिनीच्या संचालकांकडे मात्र नम्रता आहे.
🔸अनेक ठिकाणी " विकासाचा अंध:कार" पोचला नाही तिथे काम करता येईल.
🔸" माझं शिक्षण मी काम सुरु केल्यांनंतर ३ दिवसात झालं.१ ला दिवस आधी शिकलेलं विसरण्यात गेला. २ रा दिवस गावं फिरून परिस्थिती पाहण्यात गेला. ३ ऱ्या दिवशी मला सांगितले गेले आयुष्यभर एकच काम करशील तर सिद्धी मिळेल."
🔸भ्रष्टाचार दूर करायचा असेल तर संत, वैज्ञानिक, समाज यांचा सदाचार सक्रीय व्हायला हवा.
🔸"जलयुक्त शिवार" योजनेत नागरिकांचा निर्णयात आणि कामात सहभाग हवा. त्यामुळे टिकाऊ काम होईल.
🔸कंत्राटदार लाभासाठी काम करतात तर समाजाचा सहभाग असेल तर काम शुभ होईल.
🔸महाराष्ट्र हा निसर्गाचा लाडका मुलगा आहे.
🔸लाडका मुलगा बिघडला तर सुधारणे अवघड असते.
🔸जलसंधारणाचे काम केल्यावर पाणी एकदा पृथ्वीच्या पोटात गेलं की सूर्य ते चोरी करू शकत नाही.

या पद्धतीने काम करत राहिल्यास पाण्याचा प्रश्न पुष्कळ सुसह्य होईल असे वाटते.
सुधीर गाडे, पुणे

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख