मला लाभलेले भाषा शिक्षक

  लहानपणापासूनच मला भाषा विषयाचीसुद्धा आवड होती. मी भाग्यवान आहे असं मला वाटतं कारण मला लाभलेले भाषा शिक्षक अतिशय चांगले होते.





साखरवाडी विद्यालय साखरवाडी प्राथमिक विभाग या शाळेत असताना इयत्ता चौथीपर्यंत आम्हाला गोसावीबाई होत्या. शिक्षणशास्त्राच्या पद्धतीप्रमाणे उत्साहाने त्या शिकवत. त्यामुळे भाषेची ,कवितेची गोडी लागली.

पाचवीला साखरवाडी विद्यालय साखरवाडी माध्यमिक विभाग या शाळेत प्रवेश घेतला. तिथे भाषा विषयासाठी आम्हाला खूप चांगले शिक्षक होते. मातृभाषा मराठी शिकवणारे ल.क. देशपांडे सर,
ऐनापुरे बाई, हिंदी भाषा शिकवणारे श्री.व्यं. कुलकर्णी सर ( नेहमी अनमोल घडी चित्रपटाचं उदाहरण देऊन वेळेचं महत्त्व सांगायचे), नरगुंदेबाई, वीरकर बाई, इंग्लिश भाषा शिकवणारे न.चिं.बर्वे सर, स.रा. बोकील सर, श्रद्धा वाळिंबे बाई असे सर्व भाषा शिक्षक आम्हाला समरसून शिकवायचे. या सर्वांवर मी छोटे छोटे लेख लिहिले आहेत. या सगळ्या शिक्षकांमुळे पाठ्यपुस्तकातील धडे कविता याबरोबरच अन्य पुस्तकांच्या वाचनाची देखील गोडी लागली आणि ती वाढतच गेली.
अकरावी-बारावीला पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकत असताना आम्हाला मराठी शिकवण्यासाठी डॉ. नीलिमा गुंडी मॅडम, परसपटकी मॅडम होत्या. दोघींनीही आपापल्या शैली प्रमाणे आम्हाला चांगले शिकवले. त्याच वेळी आम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी अरूण बेलसरे सर होते. त्यांचंदेखील शिकवणं लक्षात राहिलं आहे.
१२ वी नंतर रयत शिक्षण संस्थेच्या साताऱ्यामधील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना पहिल्या वर्षी कम्युनिकेशन स्किल्स हा भाषाविषयक पेपर शिकवणारे डॉ.एम. ए. शेख हे देखील चांगले शिक्षक होते."तुम्हाला एक भाषा चांगली येत असेल तर तुम्हाला अन्य भाषा चांगल्या येऊ शकतात." आमचे शेख सर सांगत असत. हे खरं आहे हे मला देखील पटलं आहे.
या सर्व शिक्षक मंडळींमुळे माझी भाषा चांगली झाली असे मला वाटते. सर्व शिक्षकांना विनम्र प्रणाम!
सुधीर गाडे, पुणे

Comments

  1. गाडे सर खरोखरच भाग्यवान आहात! बाल वाडी ते पदवी पर्यंत उत्तम भाषा शिक्षक लावल्यामुळे उत्तम शब्द संपदा आणि ओघवती भाषा आपल्या लिखाणातून ते प्रतीत होते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख